News Flash

पाकची शेपूट वाकडीच!; बीएसएफच्या कॅम्पवर गोळीबार, ग्रेनेड हल्ले

या वर्षातील पहिलीच घटना

संग्रहित छायाचित्र.

पाकिस्तानी सैन्याने आज, गुरुवारी दुपारच्या सुमारास आंतरराष्ट्रीय सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानी सैन्याकडून जम्मू-काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या केंद्रावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. ग्रेनेडही फेकण्यात आले. बीएसएफच्या जवानांनीही पाकिस्तानी सैन्याच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले.

भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर आज पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याची या वर्षातील ही पहिलीच घटना आहे. जम्मू येथील सांबा सेक्टरमधील बीएसएफच्या कॅम्पवर पाकिस्तानी सैन्याने दुपारी साडेतीनच्या सुमारास तुफान गोळीबार केला. त्यानंतर ग्रेनेडही फेकण्यात आले. सुरक्षा दलाच्या जवानांनीही पाकिस्तानी सैन्याला चोख प्रत्युत्तर दिल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

सीमेवरील चौकीवर पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार सुरूच होता. तसेच बॉबियान चौकीजळ जवळपास अर्धा डझन ग्रेनेडही फेकण्यात आले. पाकिस्तानी सैन्याकडून या चौकीवर अनेकदा हल्ले करण्यात आले आहेत, अशी माहितीही अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहितीही त्यांनी दिली. गेल्या वर्षी २९ आणि ३० नोव्हेंबरच्या मध्यरात्री पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर पहिल्यांदाज अशा प्रकारची घटना समोर आली आहे. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याची या वर्षातील ही पहिलीच घटना आहे, अशी माहितीही अधिकाऱ्याकडून देण्यात आली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2017 6:31 pm

Web Title: ceasefire violation pakistan troops fires at jammu bsf post
Next Stories
1 Aircel-Maxis case: माजी केंद्रीय मंत्री दयानिधी मारन यांच्यासह सर्व आरोपी दोषमुक्त
2 हाफिज सईदवर परदेश प्रवासास निर्बंध
3 VIDEO: चिमुरडीसमोर मृत्यूही हरला!; १५ तासांनंतरही इमारतीच्या ढिगाऱ्याखाली जिवंत सापडली!
Just Now!
X