27 September 2020

News Flash

CoronaVirus : कामगारांचे स्थलांतर रोखण्यासाठी केंद्राकडून राज्यांना कडक निर्देश

विद्यार्थी व कामगारांना जागा रिकाम्या करण्यास सांगणाऱ्यांवर होणार कडक कारवाई

सध्या जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोना व्हायरसने आता भारतात देखील आपले जाळे विस्तारण्यास झपाट्याने सुरूवात केल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशात 21 दिवसांसाठी लॉक डाऊनचा निर्णय घेतलेला आहे. मात्र तरी देखील देशभरातील अनेक ठिकाणी नागरिकांकडून या निर्णयाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता सरकारकडून कठोर निर्णय घेतले जाण्याची चिन्ह दिसत आहे.

केंद्र सरकारने अद्यापही सरकारीन सूचनांना गांभिर्याने न घेणाऱ्यांविरोधात कडक भूमिका घेतली आहे. सध्याच्या लॉक डाऊनच्या आदेशाला झुगारून छुप्या पद्धतीने स्थलांतर करणाऱ्यांवर आता बारकाईने लक्ष असणार आहे. यासाठी केंद्र सरकारने राज्य व जिल्ह्यांच्या सीमा काटेकोरपणे बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

याचबरोबर केंद्र सरकारकडून राज्यांना हे देखील निर्देश देण्यात आले आहेत की, प्रवासी कामगारांना ते आहेत त्या ठिकाणीच सर्व सुविधा मिळतील याची खात्री करून घ्यावी. एवढच नाहीतर कामगारांना वेळच्यावेळी वेतन दिले जावे, यासाठी देखील सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच, अशा परिस्थितीतही विद्यार्थी व कामगारांना जागा खाली करण्यास सांगणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचेही राज्य सरकारांना आदेश देण्यात आले आहेत.

राज्यात दिवसेंदिवस करोना संसर्गांचा आकडा वाढत असताना मृतांची संख्येतही धिम्या गतीनं वाढू लागली आहे. राज्यात दिवसेंदिवस करोना संसर्गांचा आकडा वाढत असताना मृतांची संख्येतही धिम्या गतीनं वाढू लागली आहे. यात आतापर्यंत सर्वाधिक मृत्यु झालेल्या मुंबईत रविवारी आणखी एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागानं यासंदर्भातील माहिती दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2020 3:38 pm

Web Title: center directs states to ensure no movement of people across cities msr 87
Next Stories
1 Coronavirus: “मी नऊ महिने आईच्या गर्भात राहू शकते तर…”; पंतप्रधानांनी शेअर केलेला हा गोंडस फोटो पाहिलात का?
2 Corornavirus: क्वारंटाइनसाठी स्वतंत्र खोली नाही; मजूरांनी झाडावर केली राहण्याची सोय
3 कोरोनाचा सामना करण्यासाठी सरसावले मदतीचे हात; JSW ग्रुप करणार १०० कोटींची मदत
Just Now!
X