News Flash

गुजरातमध्ये गायींवर होणार संशोधन; राज्यपालांच्या हस्ते केंद्राचं उद्घाटन

ग्रामीण भागातील महिलांना शेण व गौमूत्र उत्पादनांची निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे

गुजरात टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीने (जीटीयू)

गुजरातमध्ये विज्ञान-आधारित संशोधन व नवीन उपक्रमांची स्थापना करुन गायीचे दूध, गौमूत्र आणि शेणाच्या पारंपारिक वापरास प्रोत्साहन देण्यासाठी गुजरात टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीने (जीटीयू) एक गाय संशोधन केंद्र (गौ अनुसंधान युनिट) सुरू केले आहे. राष्ट्रीय कामधेनू आयोगाच्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या कामधेनु संस्थेमार्फत शनिवारी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते या संशोधन केंद्राचे उद्घाटन केले.

कामधेनु युनिव्हर्सिटी आणि कृषी विद्यापीठासह या क्षेत्रात कार्यरत असलेल्या इतर विद्यापीठांचे साहाय्य या केंद्राला मिळणार आहे. तर जीटीयूच्या परिसरातील ग्रामीण भागातील महिलांना शेण व गौमूत्र उत्पादनांची निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना रोजगार देखील मिळणार आहे.

गुजरातमध्ये गोशाळेत कोविड सेंटर; रुग्णांवर गोमूत्र व दूधाच्या मदतीने उपचार

“सध्या फक्त गायींवर भावनिकच चर्चा होत असते. गायीवर अद्याप फारसे वैज्ञानिक कार्य हाती घेतलेले नाही. आम्ही वैज्ञानिक संशोधन आणि नवकल्पनांच्या माध्यमातून पारंपारिक ज्ञान समोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत, असे जीटीयूचे कुलगुरू नवीन शेठ म्हणाले.

गौमूत्रच्या अर्कावर संशोधन करण्यात येणार

जी.टी.यू. च्या ग्रॅज्युएट स्कूल ऑफ फर-मॅसीचे प्राध्यापक डॉ. संजय चौहान यांनी देशी गायींच्या गौमूत्रापासून औषधे, खते बनवण्याचे संशोधन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. “या संशोधन केंद्राचे लक्ष्य वैज्ञानिकदृष्ट्या गायीपासून मिळणाऱ्या सर्व गोष्टींवर संशोधन करण्याचे आहे. गौमूत्रामध्ये बर्‍याच प्रकारचे जीवाणू असतात. संशोधन आणि नवकल्पनांच्या माध्यमातून हे जीवाणू अनेक उपचारांमध्ये वापरले जाऊ शकणार आहे.” डॉ. चौहान यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, गौमूत्रच्या अर्कामध्ये औषधी मूल्य आहे तसेच जमिनीचे पुनरुत्पादन वाढवण्यासाठी त्याचा उपयोग करता येऊ शकणार आहे.

“लोकांना गायी दत्तक घेण्यासाठी प्रोत्साहन द्या”, योगी आदित्यनाथांचं महापौर आणि नगरसेवकांना आवाहन

जीटीयू या विषयात मोठी भूमिका बजावू शकणार आहे असे वेदिक अभ्यासक आणि देशी गायींच्या संरक्षणासाठी काम करणारे देवव्रत म्हणाले. राष्ट्रीय कामधेनु आयोगाचे माजी अध्यक्ष वल्लभभाई कथिरिया हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2021 9:48 am

Web Title: center for research on cows started in gujarat inauguration by the governor acharya devvrat abn 97
Next Stories
1 Covid 19: चीनमधील खाण, कामगारांचा मृत्यू आणि RaBt-CoV चं रहस्य…; पुणेकर दांपत्याने वेधलं जगाचं लक्ष
2 पाकिस्तानात भीषण अपघात; दोन रेल्वे गाड्यांची धडक, ३० प्रवासी ठार
3 Coronavirus : अ‍ॅण्टीबॉडीज निर्माण करण्यात ‘कोव्हिशिल्ड’ ‘कोव्हॅक्सिन’पेक्षा सरस; संशोधकांचा दावा
Just Now!
X