काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी केंद्र सरकारच्या लस धोरणावर टीका केली. केंद्र सरकारचे लस धोरण भेदाभेद करणारे असून धोरणामध्ये दुर्बल घटकांसाठी लशीची हमी देण्यात आलेली नाही, असे गांधी यांनी म्हटले आहे. दुर्बल घटकांना लशीची हमी नाही, केंद्र सरकारची भेदाभेद करणारी रणनीती आहे, वितरणाची रणनीती नाही, असे राहुल गांधी यांनी ट्वीट केले आहे.

खात्यात पैसे जमा करण्याची जबाबदारी केंद्राची

स्थलांतरित कामगारांना आर्थिक साहाय्य देण्याची मागणी मंगळवारी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. स्थलांतरित कामगारांच्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढणाचे खापर जनतेवर फोडणारे सरकार सहकार्याची भूमिका घेणार आहे का, असा सवाल त्यांनी केला.