केंद्र सरकारकडून सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या देशातील पहिल्या दहा स्वच्छ शहरांच्या यादीत पिंपरी-चिंचवड आणि मुंबईने स्थान मिळवले आहे. मात्र, त्याचवेळी या यादीत कल्याण-डोंबिवली ही दोन शहरे थेट ६४व्या स्थानी फेकली गेल्याने ‘स्वच्छ भारत’सारख्या उपक्रमांचा प्रभाव विशिष्ट भागांपुरताच मर्यादित असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे ७३ शहरांच्या या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वाराणसी शहरही तळाच्या स्थानी (६५) आहे. केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी दिल्ली येथील पत्रकारपरिषेत याबद्दलची माहिती दिली. स्वच्छ शहरांच्या यादीत कर्नाटकमधील मैसूर या शहराने पहिले स्थान मिळवले आहे.
देशातील १० स्वच्छ शहरे पुढीलप्रमाणे:
मैसूर- कर्नाटक
चंदीगड
तिरूचिरापल्ली- तामिळनाडू
नवी दिल्ली
विशाखापट्टणम- आंध्र प्रदेश
सुरत
राजकोट- गुजरात
गंगटोक- सिक्कीम
पिंपरी-चिंचवड
मुंबई
स्वच्छ शहरांच्या यादीत तळाच्या स्थानी असलेली शहरे पुढीलप्रमाणे:
कल्याण-डोंबिवली ( ६४)
वाराणसी (६५)
जमशेदपूर- झारखंड (६६)
गाझियाबाद- उत्तरप्रदेश (६७)
रायपूर- छत्तीसगढ (६८)
मेरठ- उत्तरप्रदेश (६९)
पाटणा (७०)
इटानगर- अरूणाचल प्रदेश (७१)
असनसोल- पश्चिम बंगाल (७२)
धनाबाद- झारखंड (७३)
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 15, 2016 4:41 pm