आगामी सणासुदीचा काळ लक्षात घेता केंद्र सरकारने महागाई भत्ता ८० टक्क्यांवरून ९० टक्के करण्याचे ठरवले आहे. त्याचा फायदा ५० लाख केंद्र सरकारी कर्मचारी व ३० लाख निवृत्तिवेतनधारक यांना होणार आहे.  
   सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महागाई भत्त्यातील १० टक्के वाढ  १ जुलैपासून अमलात येणार आहे. जूनमधील अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाचा विचार करता मूळ वेतनाच्या तुलनेत महागाई भत्ता ९० टक्के असल्याचा अंदाज आहे.