News Flash

‘बीएसएनएलला विसरुन सरकारची जिओला मदत’

जिओबरोबर कोणी स्पर्धा करु नये म्हणून सरकारने बीएसएनएलला ४ जी सेवेसाठी स्पेक्ट्रमचे वाटप केले नाही

‘बीएसएनएलला विसरुन सरकारची जिओला मदत’
सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी बीएसएनएलच्या कर्मचारी संघटनांनी दूरसंचार क्षेत्रातील आर्थिक संकटासाठी खासगी कंपनी रिलायन्स जिओला जबाबदार ठरवले आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी बीएसएनएलच्या कर्मचारी संघटनांनी दूरसंचार क्षेत्रातील आर्थिक संकटासाठी खासगी कंपनी रिलायन्स जिओला जबाबदार ठरवले आहे. सरकार इतर कंपन्यांच्या तुलनेत रिलायन्स जिओला संरक्षण देत असल्याचा आरोप या संघटनांनी केला आहे. कर्मचारी संघटनांनी याविरोधात ३ डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याची घोषणा केली आहे.

जिओबरोबर कोणी स्पर्धा करु नये म्हणून सरकारने बीएसएनएलला ४ जी सेवेसाठी स्पेक्ट्रमचे वाटप केले नाही, असा दावा या कर्मचारी संघटनांनी केला आहे. दरम्यान, रिलायनस जिओने या सर्व आरोपांवर प्रतिक्रिया दिलेली नाही.

बीएसएनएलच्या संघटनांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, सध्या दूरसंचार क्षेत्र संकटात आहे. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील कंपनीने बाजाराची परिस्थिती बिघडवून टाकली आहे. बीएसएनएलसह आपल्या सर्व प्रतिस्पर्ध्यांना बाजारातून गायब करण्याचा जिओचा खेळ आहे. पैशाच्या ताकदीवर रिलायन्स जिओ गुंतवणुकीपेक्षा कमी दरात सेवा देत असल्याचा आरोप ऑल इंडिया अँड असोसिएट्स ऑफ बीएसएनएलने (एयूएबी) केला आहे.

एयूएबीने म्हटले आहे की, खासगी क्षेत्रातील अनेक दूरसंचार कंपन्या एअरसेल, टाटा टेलिसर्व्हिसेस, अनिल अंबानी यांची रिलायन्स टेलिकम्युनिकेशन्स आणि टेलिनॉर या कंपन्यांनी आधीच आपली मोबाइल व्यवसाय बंद केला आहे. बाजारातील स्पर्धा संपुष्टात आल्यानंतर जिओ आपल्या दरात वाढ करेल.

कालांतराने जिओ कॉल आणि डेटा शूल्कातही मोठ्याप्रमाणात वाढ करुन जनतेची लूट करेल. हा आमच्यासाठी चिंतेचा विषय आहे. रिलायन्स जिओला नरेंद्र मोदी सरकारचे खुलेआम संरक्षा मिळत आहे. दरम्यान, पंतप्रधान कार्यालयाकडून याप्रकरणी प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2018 6:38 am

Web Title: central government forgot bsnl and support private sectors jio says staff unions
Next Stories
1 जम्मू-काश्मीर: पुलवामा येथील चकमकीत २ दहशतवाद्यांचा खात्मा, शस्त्रास्त्रे जप्त
2 यूपीए काळातील ‘जीडीपी’त बदल हा भाजपाचा ‘वाईट विनोद’: चिदंबरम
3 भगवान हनुमानाला दलित म्हटल्याप्रकरणी ब्राह्मण सभेची योगी आदित्यनाथांना नोटीस
Just Now!
X