देशातील करोनाचं संकट पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्य तज्ज्ञांसोबत वर्चुअल बैठक घेतली. या बैठकीत महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर केंद्रातील मोदी सरकार सोमवारी मोठा निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एमबीबीएस आणि नर्सिंगच्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना कोविड ड्युटीसाठी तैनात करण्याचा निर्णय घेणार असल्याचं बोललं जात आहे. त्याचबरोबर मेडिकल प्रवेशासाठी असलेली NEET परीक्षा रद्द करण्याची शक्यता आहे. तसेच एमबीबीएस अंतिम वर्षाची परीक्षाही लवकर घेतल्या जाण्याची शक्यता आहे.

सध्या देशात आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा वाजले आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण वाढत चालला आहे. या मुद्द्यावर वर्चुअल बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर उद्या निर्णय घेण्याची शक्यता आहे.

आंध्रप्रदेश : शासकीय कोविड रूग्णालयात १४ रूग्णांचा मृत्यू

सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात असून, करोनाच्या संसर्गाच्या प्रसाराला अद्यापही ब्रेक लागलेला नाही. देशात विक्रमी रुग्णांची वाढ होत आहे. तर दुसरीकडे मृतांच्या आकड्यात कोणतीही घट होताना दिसत नाहीये. देशात गेल्या २४ तासांत ३,९२,४८८ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. तर साडेतीन हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

Corona Crisis : हरयाणात ३ मे पासून सात दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाउनची घोषणा

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या २४ तासांतील आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. २४ तासांत देशात ३ लाख ९२ हजार ४८८ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. तर ३ हजार ६८९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. याच कालावधीत देशभरात ३ लाख ७ हजार ८६५ हजार रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. देशात सध्या ३३ लाख ४९ हजार ६४४ रुग्ण उपचार घेत आहेत. तर देशातील एकूण मृत्यूंची संख्या २ लाख १५ हजार ५४२ हजार इतकी झाली आहे.