27 September 2020

News Flash

आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करा; केंद्राचे राज्य सरकारांना आदेश

विविध राज्यांमधील ७५ जिल्ह्यांमध्ये पूर्णत: लॉकडाऊन करण्यात आलं आहे.

संग्रहित छायाचित्र

देशातील ७५ जिल्हे पूर्णत: लॉकडाऊन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, या आदेशाचा उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी असे कठोर निर्देश केंद्र सरकारनं राज्य सरकारांना दिले आहेत. देशात करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विविध राज्यांमधील ७५ जिल्ह्यांमध्ये पूर्णत: लॉकडाऊन करण्यात आलं आहे. तसंच या ठिकाणी बाहेरच्या नागरिकांना पूर्णपणे प्रवेशबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील नागरिकांनी लॉकडाऊन गांभीर्य समजावं, असं म्हटलं होतं.

करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभरात करण्यात आलेलं लॉकडाऊन अनेकजण गांभीर्याने घेत नाहीत असं दिसून येतं आहे. ही चिंतेची बाब आहे करोनाच्या संकटाशी लढा द्यायचा असेल तर लॉकडाउन गांभीर्यानं घ्या. घरी थांबा, स्वतःचा आणि कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालू नका, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा केलं आहे. एक ट्विट करुन त्यांनी हे आवाहन केलं आहे. सरकारने दिलेल्या निर्देशांचे पालन करा असंही त्यांनी म्हटलं आहे. तसंच देशातल्या सगळ्या राज्य सरकारांनी नियम आणि कायदे पाळावेत असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर देशात रविवारी जनता कर्फ्यू पाळण्यात आला. हा जनता कर्फ्यू ३१ मार्च पर्यंत वाढवण्यात आल्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने रविवारीच दिला. तरीही मुंबईतल्या रस्त्यांवर खासगी वाहनांमधून येणाऱ्या मुंबईकरांची संख्या वाढलेली दिसून आली. लोक काही अत्यावश्यक काम असल्याशिवायही बाहेर पडल्याचं दिसलं आहे. महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यातही असं चित्र दिसून आलं. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन लॉकडाउन गांभीर्याने घ्या असं आवाहन पुन्हा एकदा केलं आहे. स्वयंशिस्त महत्त्वाची आहे. गरज नसेल तर बाहेर पडू नका, आपला आणि आपल्या कुटुंबीयांचा जीव वाचवण्यासाठी हे आपल्याला करायचं आहे असंही मोदींनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 23, 2020 11:54 am

Web Title: central government said take action against those who dont obey rules coronavirus jud 87
Next Stories
1 गुजरातमध्ये ९३ जणांकडून होम क्वारंटाइनचे उल्लंघन, १० जणांविरोधात FIR
2 निर्भया दोषींच्या फाशीआधी जल्लाद म्हणाला… “आधी फासावर लटकवतो, मग खाण्यापिण्याचं बघू”
3 Coronavirus: डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केली चीनवरील नाराजी, म्हणाले…
Just Now!
X