News Flash

पाकिस्तानला लस पुरवठयाच्या प्रश्नावर भारताने भूमिका केली स्पष्ट

भारत माणुसकीच्या दृष्टीने शेजारी देशांना मदत करत असला, तरी....

संग्रहित छायाचित्र

देशात लसीकरणाला सुरुवात झालेली असताना, मोदी सरकारकडून लस डिप्लोमसीही जोरात सुरु आहे. नेपाळ, भूतान, म्यानमार, बांगलादेश, सेशेल्स, मॉरिशेस या शेजारी देशांना भारताने लसींचा साठा पाठवला आहे. आता पाकिस्तानलाही लसीचा पुरवठा करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. सध्याच्या घडीला लस जीवरक्षक असल्याने सगळयाच देशांना करोना प्रतिबंधक लस हवी आहे.

भारत माणुसकीच्या दृष्टीने शेजारी देशांना मदत करत असला, तरी चीन-पाकिस्तान बरोबर भारताचे संबंध सामान्य नाहीत. दहशतवादाला प्रोत्साहन देणं, भारतावर हल्ले घडवणं या पाकिस्तानच्या प्रवृत्तीमुळे दोन्ही देशांच्या संबंधात नेहमीच तणाव असतो. पाकिस्तानने निर्माण केलेला दहशतवादाचा राक्षस आज त्यांच्यावरच उलटला आहे. पण अजूनही पाकिस्तान सुधरलेला नाही.

आता भारत पाकिस्तानला लस पुरवठयाचा विचार करणारा का? असा मुद्दा उपस्थित केला जातोय. त्यावर पाकिस्तानकडून लस पुरवठयासाठी अजून कोणतीही विनंती आलेली नाही, असे भारताकडून शुक्रवारी सांगण्यात आले. भारताने आतापर्यंत बांगलादेश, नेपाळ, म्यानमार, भूतान आणि मालदीव या देशांना ‘कोव्हिशिल्ड’ लसीचा साठा पाठवून दिलाय. काही मंजुऱ्या मिळाल्यानंतर अफगाणिस्तान, श्रीलंका या देशांनाही ‘कोव्हिशिल्ड’ लसीचा पुरवठा सुरु होईल. “भारतीय बनावटीची लस पाठवण्यासाठी पाकिस्तानने कोणतीही विनंती केल्याचे मला माहित नाही” असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2021 1:52 pm

Web Title: central government says no request from pakistan yet for vaccine supply dmp 82
Next Stories
1 शेतकरी नेत्यांच्या हत्येच्या कटाची कबूली देणाऱ्या आरोपीचा यू-टर्न; नवा व्हिडीओ आला समोर
2 लालू प्रसाद यादव यांच्या फुफ्फुसात पाणी, प्रकृती चिंताजनक; तेजस्वी घेणार नितीश कुमार यांची भेट
3 चार शेतकरी नेत्यांची गोळ्या घालून हत्या करण्याचा कट; आंदोलनस्थळी आरोपीला पकडलं
Just Now!
X