नवी दिल्ली : केंद्र सरकारने प्रादेशिक हवाई संपर्कासाठी ‘उडान’ योजना सुरू करून वापर नसलेली आणि कमी वापर असलेले विमानतळ देशाच्या नागरी हवाई नकाशावर आणण्यास सुरुवात केल्यानंतर कर्नाटकमधील हम्पी, सिक्कीममधील गंगटोक, उत्तराखंडमधील पिठोरगड आणि हिमाचल प्रदेशमधील सिमला या पर्यटनस्थळांकडे पर्यटकांचा ओघ वाढला आहे.

ही योजना सुरू झाल्यानंतर पहिल्या २० महिन्यांत जळपास ११ लाख प्रवाशांनी ‘उडान’चा लाभ घेतला. विमान कंपन्यांनी कमी वापर असलेल्या आणि वापर नसलेल्या  ३७ विमानतळांवर १२० हवाई मार्ग सुरू केले आहेत. पर्यटन उद्योगातील तज्ज्ञांच्या मते ‘उडान’ योजनेमुळे पर्यटनस्थळांकडे पर्यटकांचा कल वाढत अशल्याचे आढळले आहे. आतापर्यंत तेथे रेल्वे आणि रस्तेवाहतूकही उपलब्ध नव्हती.

न्यूयॉर्क टाइम्सने २०१९ मधील ५२ पर्यटनस्थळांच्या यादीमध्ये हम्पीला दुसरा क्रमांक दिला आहे. ‘युनेस्को’ने वारसा दर्जा दिलेल्या स्थळापर्यंत पोहोचणे कठीण होते.