१०० कोटींपेक्षा कमी खर्च आलेले टोलनाके बंद करण्याचा केंद्र सरकार विचार करीत असल्याचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी राज्यसभेत सांगितले. देशातील ६२ टोलनाके बंद करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, पीपीपी मॉडेलनुसार १०० कोटींपेक्षा कमी खर्च आलेले टोलनाके बंद करण्याचा केंद्र सरकार विचार करीत आहे. त्याचबरोबर टोलनाक्यांवर ई-टोल पद्धतही सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये प्रवाशांना बॅंकेमध्ये पैसे भरल्यानंतर त्यांना एक स्टिकर देण्यात येईल. हे स्टिकर गाडीवर लावल्यानंतर त्यांना टोलनाक्यांवर थांबण्याची गरज पडणार नाही, असे त्यांनी सांगितले.