21 September 2020

News Flash

गृहमंत्री अमित शाह यांची करोना चाचणी निगेटीव्ह, ट्विट करुन दिली माहिती

मेदांता रुग्णालयात सुरु होते उपचार

भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह करोनामुक्त झाले आहेत. स्वतः अमित शाह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याची माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी अमित शाह यांचा करोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता. यानंतर त्यांच्यावर मेदांता हॉस्पिटलमद्ये उपचार सुरु होते. मात्र डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार पुढचे काही दिवस मी स्वतःला होम क्वारंटाइन करणार असल्याचं शाह यांनी स्पष्ट केलं आहे.

अमित शाह यांना २ ऑगस्ट रोजी करोनाची लागण झाली होती. अमित शाह यांनीच स्वत: ट्विट करत ही माहिती दिली होती. करोनाची प्राथमिक लक्षणं दिसत असल्याने चाचणी केली असता आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं अमित शाह यांनी सांगितलं होतं. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अमित शाह मेदांता रुग्णालयात दाखल झाले होते. यावेळी अमित शाह यांनी संपर्कात आलेल्यांना स्वत:चं विलगीकरण तसंच चाचणी करण्याची विनंती केली होती.

यावेळी अमित शाह यांनी आपण हॉस्पिटलमध्ये असताना आपल्या प्रकृतीची काळजी घेतलेल्या सर्वांचे आभार मानले आहेत. याचसोबत मेदांता हॉस्पिटलच्या डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचेही शाह यांनी आभार मानले आहेत.

दरम्यान काही दिवसांपूर्वी भाजपा खासदार मनोज तिवारी यांनी ट्विट करत अमित शाह करोनामुक्त झाल्याची माहिती दिली होती. परंतू काही वेळातचं तिवारी यांनी ते ट्विट डिलीट केल्यामुळे शाह यांच्या प्रकृतीबद्दल संभ्रम वाढला होता. अखेरीस आज खुद्द शाह यांनी आपल्या प्रकृतीविषयी माहिती दिल्यामुळे हा संभ्रम आता दूर झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2020 5:14 pm

Web Title: central home minister amit shah tested negative for covid 19 inform on twitter psd 91
टॅग Coronavirus
Next Stories
1 गेहलोत सरकारने जिंकला विश्वासदर्शक ठराव, सचिन पायलट यांनी व्यक्त केला आनंद
2 पोर्टल लाँच करत संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी सरकारचं पहिलं पाऊल
3 चीनमध्ये आर्थिक मंदी : स्मार्टफोन विक्रीत तब्बल ३५ टक्क्यांची घसरण
Just Now!
X