News Flash

पंतप्रधानांच्या परदेश प्रवासाचा खर्च जाहीर करण्याचा आदेश

ग्राहकांच्या पैशातून पंतप्रधानांच्या परदेश प्रवासाचे पैसे दिले जात असतात.

| February 28, 2018 03:02 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी (संग्रहित छायाचित्र)

देशाच्या पंतप्रधानांनी २०१३-१४  ते २०१६-१७ याकाळात परदेश भेटीसाठी एअर इंडिया व भारतीय हवाई दलाची जी विमाने भाडय़ाने घेतली होती, त्यावर करण्यात आलेला  खर्च जाहीर करावा, असा आदेश केंद्रीय माहिती आयोगाने परराष्ट्र मंत्रालयास दिला आहे.

पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यासाठी हवाई दल व एअर इंडिया यांची विमाने भाडय़ाने घेण्यात आली होती, त्यांचे संदर्भ क्रमांक , रकमा, बिलांच्या तारखा याची कागदपत्रे संकलित नसून विखुरलेली आहेत. त्यामुळे संबंधित व्यक्तीने मागितलेली माहिती नोंदींचे ढिगारे शोधून देणे शक्य नाही असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते, पण त्यांची सबब मुख्य माहिती आयुक्त आर.के. माथूर यांनी धुडकावून लावली असून ही सगळी माहिती अर्जदारास मिळाली पाहिजे असा आग्रह धरला आहे.

निवृत्त कमोडोर लोकेश बात्रा यांनी पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यातील प्रवासाची बिले, नोंदी व खर्च याची माहिती मागितली होती. सुनावणीच्या वेळी बत्रा यांनी केंद्रीय माहिती आयोगाला सांगितले, की या माहिती अर्जावर मला अपुरी माहिती देण्यात आली.

एअर इंडियाला मोठा तोटा झालेला असताना त्यांची पंतप्रधानांच्या प्रवासापोटीची बिले थकीत असून ती दिली गेली नाहीत. त्या रकमेवरचे व्याजही वाढत  गेलेले आहे. हे व्याज करदात्यांच्या पैशातूनच जाणार आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव या बिलांची माहिती नाकारता येणार नाही. कारण ग्राहकांच्या पैशातून पंतप्रधानांच्या परदेश प्रवासाचे पैसे दिले जात असतात.

जेव्हा बिले अदा केली जातात तेव्हा ती एकत्र करावीच लागतात, त्यामुळे या बिलांची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने बात्रा यांना देणे बंधनकारक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2018 3:02 am

Web Title: central information commission order to declare prime minister travel expenses
Next Stories
1 पुढील शतकात मानव व परग्रहवासीय आमनेसामने शक्य
2 ए. के. प्रधान पंजाब नॅशनल बँकेचे ग्रुप चीफ रिस्क ऑफिसर
3 ‘श्रीदेवी यांच्या मृत्यूबाबत कोणीही चुकीचे आरोप करु नये’
Just Now!
X