केंद्रीय विद्यालयात संस्कृत ही जर्मन ऐवजी तिसरी भाषा केल्यानंतर आता सरकारने केंद्रीय विद्यालयांमध्ये संस्कृत भाषा विभाग सुरू करता येतील की नाही याची चाचपणी करण्याचे आदेश दिले आहेत.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभेत सांगितले की, संस्कृत भाषेला उत्तेजन देण्यासाठी केंद्रीय विद्यापीठांना संस्कृत विभाग सुरू करण्यास सांगण्यात आले आहे. सध्या संस्कृत विभाग या विद्यापीठात नाहीत. विद्यापीठ अनुदान आयोग पाच संस्कृत विद्यापीठे व दोन संस्कृत अभिमत विद्यापीठे यांना अनुदान देत आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या आदेशात जर्मन ही केंद्रीय विद्यालयात तिसरी भाषा म्हणून ठेवण्याचा आदेश दिला होता. पण जर्मन भाषा शिकवणे हे शैक्षणिक धोरणाच्या विरोधात आहे, असे इराणी यांचे मत आहे.