देशात १ सप्टेंबरपासून अनलॉकचा चौथा टप्पा सुरू होत आहे. केंद्र सरकारनं अनलॉक ४ मध्ये सुरू काही गोष्टी करण्यासाठी परवानगी दिली असून, शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीही मार्गदर्शक नियमावली जाहीर केली आहे. ९ ते १२ वी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन घेण्यासाठी शिक्षकांना शाळेत वा महाविद्यालयात जाऊन भेट घेण्यास परवानगी दिली आहे. त्यासाठी काही नियम सरकारनं जाहीर केले आहेत.

अनलॉक ४ साठी केंद्र सरकारनं नियमावली जाहीर केली. १ सप्टेंबरपासून हा चौथा टप्पा सुरू होणार आहे. केंद्र सरकारनं सामाजिक, धार्मिक, मनोरंजन, सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी दिली असली, तरी हे कार्यक्रम २१ सप्टेंबरनंतर आयोजित करता येणार आहे. त्यासाठीही महत्त्वाच्या सूचना केंद्रानं दिल्या आहेत.

विशेष म्हणजे शाळा महाविद्यालये बंद राहणार आहे. मात्र, कंटेंनमेंट झोनमध्ये नसलेल्या शाळा, महाविद्यालयांमध्ये ५० टक्के कर्मचारी बोलवण्यास केंद्रानं मूभा दिली आहे. त्याचबरोबर सरकारनं ९ ते १२ वी इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा दिला आहे. अनलॉक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शिक्षकांचं मार्गदर्शन घेण्यासाठी शाळा, महाविद्यालयात जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. स्वइच्छेनं शाळेत जाण्याची अनुमती देण्यात आली असली, तरी यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांची लेखी सहमती त्यासाठी आवश्यक असणार आहे.

केंद्र सरकारनं ही परवानगी दिली असली, तरी ही मूभा कंटेंमेंट झोनमध्ये नसलेल्या विद्यार्थ्यांसाठीच असणार आहे. कंटेंमेंट झोनमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षकांना भेटता येणार नाही. केंद्र सरकारनं सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांशी चर्चा केल्यानंतर शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.