News Flash

करोनामुळे मृत्यू झालेल्या ६७ पत्रकारांच्या कुटुंबास मिळणार ५ लाख रुपये आर्थिक मदत!

केंद्र सरकारने दिली मंजुरी

या चौथ्या सेरो सर्वेत ६ ते १७ वर्षे वयोगटतील मुलांचा देखील समावेश करण्यात आला होता.(संग्रहीत फोटो)

देशात करोना करोना महमारीमुळे आतापर्यंत लाखो जणांना जीव गमावावा लागला आहे. यामुळे कित्येक कुटुंबांनी आधार गमवाला आहे. यामध्ये सामान्य नागरिकच नाही तर अगदी व्हीआयपी व्यक्तींपासून ते करोना योद्धे, शासकीय कर्मचारी, सेलिब्रिटी व पत्रकारांचा देखील समावेश आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्र सरकारकडून करोनामुळे मृत्यू झालेल्या ६७ पत्रकारांच्या कुटुंबासाठी ५ लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे. एएनआयने याबाबत वृत्त दिलं आहे. त्यानुसार भारत सरकारने करोनामुळे मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या ६७ कुटुंबाना आर्थिक मदतीसाठी मंजुरी दिली आहे. गुरूवारी माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या पत्रकार कल्याण योजनेअंतर्गत प्रत्येक परिवारास ५ लाख रुपये देण्याचे जाहीर केले आहे.

अनेक दिवसांपासून करोनामुळे मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबासाठी आर्थिक मदत दिली जावी, अशी मागणी केली जात होती. झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुवर दास यांनी देखील अशा कुटुंबासाठी सहायता निधीची मागणी केलेली आहे.
केंद्र सरकारने देखील हा मुद्दा गांभीर्याने घेत गुरूवारी एका बैठकीत आर्थिक मदतीसाठी मंजुरी दिली. केंद्र सरकार ६७ पत्रकारांच्या प्रत्येक कुटुंबास ५ लाख रुपये आर्थिक मदत देणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2021 8:44 pm

Web Title: centre approves financial assistance to 67 families of journalists who lost their lives to covid msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 अंत्यसंस्कार केलेली व्यक्ती आली घरी; कुटुंबियांची झोपच उडाली
2 “सकारात्मकता हा मृत्यूचे आकडे लपवण्यासाठी मोदींनी केलेला PR स्टंट” : राहुल गांधी
3 Cyclone Yaas : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्या ओडिसा व पश्चिम बंगाल दौरा!
Just Now!
X