‘सेंटर फॉर मीडिया स्टडीज’च्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
केंद्रात सत्तारुढ झालेल्या नरेंद्र मोदी यांच्या सरकारला आता दोन वर्ष पूर्ण होतील. मात्र अजूनही पन्नास टक्के जनतेला त्यांच्या दैनंदिन जीवनात काही फरक पडलेला जाणवत नसल्याचे एका सर्वेक्षणात उघड झाले आहे. तर १५ टक्के जणांनी पुर्वीपेक्षा परिस्थिती खालावल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
सेंटर फॉर मिडिया स्टीजने या बाबत सर्वेक्षण केले आहे. त्यात मोदी सरकारच्या योजनांपासून गरीबांना कोणताही लाभ झाला नसल्याचे मत ४३ टक्के जणांनी नोंदवले आहे. एकीकके सरकारच्या कामगिरीबाबत नाराजी असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामगिरीबाबत ६२ टक्के प्रतिसादकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. तर ७० टक्के जणांनी मोदींनी पाच वर्षांनंतरही पंतप्रधानपदावर रहावे असा अभिप्राय दिला आहे. तीस टक्यांपेक्षा कमी नागरिकांनी मात्र मोदींनी आश्वासन पाळल्याचे सांगितले. तर ४८ टक्के नागरिकांनी मोदींनी काही प्रमाणात आश्वासने पाळल्याचे सांगितले. याबाबतचे निष्कर्ष घटना अभ्यासक सुभाष कश्यप यांनी पत्रकार परिषदेत शनिवारी जाहीर केले.

सर्वेक्षणात..
देशभरातील ४००० लोकांचा सहभाग ’ १५ राज्यांमधील शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना प्रश्नावली