News Flash

मुंबई-बंगळुरू कॉरिडॉरला मान्यता

मुंबई-बंगळुरू प्रस्तावित औद्योगिक कॉरिडॉरला कितपत यश मिळेल याची व्यवहार्यता तपासून पाहण्याचे सरकारने तत्त्वत: मान्य केले असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्यमंत्री आनंद शर्मा यांनी शनिवारी येथे दिली.

| March 17, 2013 12:02 pm

मुंबई-बंगळुरू प्रस्तावित औद्योगिक कॉरिडॉरला कितपत यश मिळेल याची व्यवहार्यता तपासून पाहण्याचे सरकारने तत्त्वत: मान्य केले असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्यमंत्री आनंद शर्मा यांनी शनिवारी येथे दिली.
प्रस्तावित कॉरिडॉरच्या अटी व शर्ती काय असाव्यात, या बाबत पडताळणी सुरू असल्याचेही शर्मा म्हणाले. कर्नाटकचे मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांच्याशी पायाभूत सुविधांबाबत चर्चा केल्यानंतर शर्मा वार्ताहरांशी बोलत होते.
चेन्नई-बंगळुरू प्रस्तावित कॉरिडॉरचा चित्रदुर्गपर्यंत विस्तार करावा, ही राज्य सरकारने केलेली मागणी केंद्र सरकारने मान्य केली आहे. दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरची लक्षणीय प्रगती पाहून केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी २०१३-१४ च्या अर्थसंकल्पात बंगळुरू-चेन्नई आणि बंगळुरू-मुंबई अशा दोन अतिरिक्त कॉरिडॉरची घोषणा केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2013 12:02 pm

Web Title: centre gives in principle nod for study on mum blr corridor
Next Stories
1 दिल्लीचे पाणी रोखण्याचा इशारा
2 बिहारला विशेष राज्याचा दर्जा द्या, नितीशकुमार यांची मागणी
3 मध्य प्रदेशात परदेशी महिलेवर सामुहिक बलात्कार
Just Now!
X