News Flash

करोनाच्या उद्रेकानंतर केंद्र सावध! महाराष्ट्रासह सहा राज्यात केंद्रीय पथकं

करोना रुग्णसंख्या वाढीच्या कारणांचा घेणार शोध

संग्रहित छायाचित्र

तब्बल आठ ते दहा महिन्यानंतर जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच करोनाचं संकट पुन्हा उभं राहताना दिसत आहे. महाराष्ट्रासह देशातील सहा राज्यांमध्ये करोना बळावताना दिसत आहे. दररोज येणाऱ्या करोना रुग्णांच्या आकडेवारीत वाढ होत असल्याचं समोर आल्यानंतर केंद्र सरकारही सावध झालं आहे. करोना उद्रेक रोखण्यासाठी आणि उपाययोजनासाठी केंद्रानं पथकं नियुक्त केली असून, ही पथकं राज्यांना मदत करणार आहे.

महाराष्ट्रासह करोनाचं संक्रमण वाढलेल्या राज्यांमध्ये तातडीने उपाययोजना करण्यासाठी केंद्रानं तीन सदस्यीय पथकं नियुक्त केली आहेत. या पथकांमध्ये विविध तज्ज्ञांचा समावेश केलेला असून, ही पथकं राज्यांना करोना प्रसारावर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत करणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील सहसचिव पदावरील अधिकारी या पथकांचं नेतृत्व करणार असून, महाराष्ट्र, केरळ, गुजरात, पंजाब, कर्नाटक आणि जम्मू व काश्मीरमध्ये विशेष लक्ष देणार आहेत, आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.

“ही पथकं राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील यंत्रणासोबत मिळून काम करतील आणि अचानक झालेल्या करोना रुग्णवाढीच्या कारणांचा शोध घेईल. करोना प्रसाराची साखळी तोडण्यासाठी पथकं राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील आरोग्य यंत्रणांना मदत करतील,” असं आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

केंद्रीय आरोग्य सचिवांनी महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, गुजरात, पंजाब, जम्मू व काश्मीर आणि केरळच्या सचिवांना लिहिलेल्या पत्रात करोनाचा प्रसार रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना हाती घेण्याबद्दल सांगितलं आहे. त्याचबरोबर संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी आरटी-पीसीआर चाचण्या वाढवण्यात याव्यात, अशी सूचनाही केंद्राने केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2021 3:52 pm

Web Title: centre rushes high level teams to states witnessing surge in coronavirus cases bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 मोठी बातमी! १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांना मोफत करोना लस
2 गुजरातमध्ये अंथरुणाला खिळलेल्या भाजपा उमेदवाराने जिंकून दाखवली निवडणूक
3 पुद्दुचेरीत राष्ट्रपती राजवट लागू; केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
Just Now!
X