News Flash

पतंजलीच्या कोरोनिलला अखेर मोदी सरकारची मान्यता, पण कशासाठी? जाणून घ्या…

पतंजलीच्या कोरनिलबाबत केंद्राचा महत्त्वाचा निर्णय

संग्रहित छायाचित्र

पतंजलीच्या कोरनिल या औषधाला अखेर मोदी सरकारची मान्यता मिळाली आहे. मात्र हे औषध करोना बरं करणारं औषध म्हणून विकता येणार नाही. तर प्रतिकार शक्ती वाढवणारं औषध म्हणून विकता येईल. प्रतिकार शक्ती वाढवणारं औषध म्हणून कोरोनिलला मोदी सरकारने मान्यता दिली आहे. बाबा रामदेव यांच्या पतंजलीचं कोरोनिल हे औषध करोनावरचा उपाय असणारं औषध म्हणून विकता येणार नाही. मात्र प्रतिकार शक्ती वाढवणारं औषध म्हणून विकता येईल असं आयुष मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. मागील आठवड्यात पतंजलीने कोरोनिल नावाचं औषध आणलं होतं या औषधाने करोना बरा होतो असाही दावा करण्यात आला होता. मात्र सरकारकडून नोटीस येताच तो दावा मागे घेण्यात आला होता.

देशात आणि जगात करोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. अशात करोनावर औषध शोधून काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजलीने कोरोनिल नावाचं औषध शोधून काढलं. हे औषध करोनावर गुणकारी आहे, हे औषध घेतल्याने करोना बरा होतो असा दावा करण्यात आला. २३ जून रोजी कोरोनिलचं लाँचही करण्यात आलं. या औषधाने करोना बरा होतो असं म्हणत याची जाहिरात करण्यात आली. ज्यानंतर आयुष मंत्रालयाने या संदर्भात पतंजलीला नोटीस धाडली. या नोटिशीनंतर यू टर्न घेत पतंजलीने आपण असा काही दावा केलाच नाही असं स्पष्ट केलं.

दरम्यान आयुष मंत्रालयाने या औषधाची चाचणी घेण्याचं ठरवलं. त्यानुसार आयुष मंत्रालयाने या औषधाची चाचणी घेतली. त्यानंतर या औषधाला प्रतिकार शक्ती वाढवणारे औषध म्हणून मंजुरी देण्यात आली आहे. प्रतिकार शक्ती वाढवणारे औषध म्हणून या औषधाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. मात्र करोना बरा होतो म्हणून हे औषध विकता येणार नाही असंही बजावलं आहे. न्यूज १८ ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2020 11:25 pm

Web Title: centre says patanjali cant sell coronil with claims of curing covid 19 approves it as immunity booster scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पश्चिम बंगालमध्ये रेशन दुकानावर मोफत अन्नधान्य – ममता बॅनर्जींची घोषणा
2 भारत पुन्हा खरेदी करणार बंकर फोडणारे स्पाइस-२००० बॉम्ब
3 मुस्लिमांची लोकसंख्या कमी करण्यासाठी चीननं केले हे अघोरी उपाय
Just Now!
X