News Flash

“केंद्र सरकार स्वतःच्या प्रतिमेसाठी लोकांच्या जीवाशी खेळ खेळतंय”

कर्नाटकातील घटनेनंतर काँग्रेसनं व्यक्त केला संताप

काँग्रेस पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा. (प्रातिनिधिक छायाचित्र)

कर्नाटकातील चमराजनगर जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनअभावी २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूवरून काँग्रेसनं संताप व्यक्त केला असून, स्वतःची प्रतिमा चांगली ठेवण्यासाठी केंद्र सरकार लोकांच्या जीवाशी खेळ करत आहे, असा आरोप काँग्रेसनं केला आहे.

कर्नाटकातील चमराजनगर शहरातील जिल्हा रुग्णालयात करोनाबाधित रुग्णांसह २४ जणांचा मृत्यू झाला. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश यांनी दिली. या घटनेनंतर कर्नाटक सरकारनं मंत्रिमंडळाची बैठकही बोलावली आहे. दरम्यान, या घटनेवरून काँग्रेसनं ट्विट करत निशाणा साधला आहे. काँग्रेसनं केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या माहितीचा हवाला देत मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे.

आणखी वाचा- काळाने साधला डाव! ऑक्सिजनअभावी २४ रुग्णांचा तडफडून मृत्यू

“केंद्र सरकार सातत्यानं खोटं बोलत आहे आणि ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मोठ्या संख्येनं लोक मरत आहेत. आपली प्रतिमा चांगली ठेवण्यासाठी सरकार लोकांच्या जीवाशी खेळ खेळत आहे. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितलं होतं की, ‘देशात ऑक्सिजनचा अजिबात तुटवडा नाही. उलट गरजेपेक्षा जास्त ऑक्सिजन आहे.’ मग ऑक्सिजनअभावी होत असलेल्या मृत्यूंना जबाबदार कोण आहे?,” असा सवाल काँग्रेसनं केला आहे.

कर्नाटकातील चमराजनगर जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मोठी दुर्दैवी घटना घडली आहे. बल्लारी येथून रुग्णालयात ऑक्सिजनचा साठा येणार होता. मात्र, ऑक्सिजन येण्यास विलंब होत असल्याने आपतकालीन ऑक्सिजनसाठी जिल्हा रुग्णालयातून मध्यरात्री २५० ऑक्सिजन सिलेंडर मैसूरला पाठवण्यात आले होते. मात्र, वेळेत ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आल्याने २४ रुग्णांचा मृत्यू झाला. यात करोनाबाधित रुग्णही आहेत.

‘करोना रुग्णांसह एकूण २४ उपचाराधीन रुग्णांचा ऑक्सिजन तुटवडा आणि इतर कारणांमुळे चमराजनगर जिल्हा रुग्णलायात २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आम्ही सध्या मृत्यूच्या अहवालाची प्रतिक्षा करत आहोत,’ असं जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश कुमार यांनी म्हटलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी चमराजनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्याचबरोबर या घटनेची दखल घेऊन उद्या मंत्रिमंडळाची बैठकही बोलावली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2021 2:01 pm

Web Title: chamarajanagar oxygen shortage 24 patients including the covid 19 positive died at a hospital bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Corona Crisis : दुसऱ्या लाटेविरोधात लढण्यासाठी SBI कडून ७१ कोटींची मदत
2 निवडणुकीच्या मैदानात सुपर ओव्हर; टॉस करुन निवडला गावप्रमुख
3 आई जगावी म्हणून मुली तोंडाने श्वास देत होत्या; रुग्णालयातील ‘तो’ क्षण पाहून सगळेच हळहळले
Just Now!
X