28 October 2020

News Flash

चांदोबाचे चित्रकार के. सी. शिवशंकर कालवश

ते ९७ वर्षांचे होते.

(संग्रहित छायाचित्र)

मुलांसाठी असलेल्या ‘चांदोबा’ मासिकातील विक्रम आणि वेताळच्या चित्रांसाठी ओळखले जाणारे चित्रकार के. सी. शिवशंकर यांचे बुधवारी चेन्नईत निधन झाले. ते ९७ वर्षांचे होते.

मूळचे तेलुगु नियतकालिक असलेल्या ‘चंदामामा’ मासिकाची स्थापना चित्रपट निर्माते बी. नागी रेड्डी व चक्रपाणी यांनी १९४७ साली केली होती. मुलांमध्ये प्रचंड लोकप्रियता लाभल्याने हे मासिक नंतर १३ भारतीय भाषांमध्ये प्रकाशित होऊ लागले. या प्रकाशनाच्या मूळ डिझायनर चमूतील शिवशंकर हे अखेरचे सदस्य होते.

तमिळनाडूच्या ईरोड जिल्ह्य़ातील एका खेडय़ात जन्मलेल्या शिवशंकर यांनी कला महाविद्यालयातून ५ वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. १९४६ साली यात उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी ‘कलाईमगल’ या तमिळ मासिकात काम सुरू केले. १९५२ साली ते चंदामामा मासिकात रुजू झाले आणि २०१२ साली या मासिकाचे प्रकाशन बंद होईपर्यंत ६० वर्षे त्यांनी यात चित्रे काढण्याचे काम केले. त्यानंतर ते रामकृष्ण विजयम मासिकात काम करू लागले.

शिवशंकर यांनी चंदामामा मासिकात महाभारत व रामायणातील कथांसह अनेक कथांसाठी चित्रे काढली, मात्र ‘विक्रम आणि वेताळ’ मालिकेसाठी काढलेल्या चित्रांमुळे त्यांना ख्याती मिळाली. एका हातात तलवार घेतलेल्या आणि खांद्यावर शव घेऊन जाणाऱ्या विक्रम राजाचे चित्र चंदामामा मासिकाच्या वाचकांच्या नेहमी स्मरणात राहील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 2, 2020 12:36 am

Web Title: chandoba painter k c shivshankar pass away abn 97
Next Stories
1 ब्रेग्झिट विधेयकावरून ‘ईयू’ची ब्रिटनविरुद्ध कायदेशीर कारवाई
2 कारखान्यांबाबत गुजरातच्या अधिसूचना रद्द
3 बलात्कार झालाच नाही!
Just Now!
X