News Flash

तेलंगणला विशेष दर्जा द्यावा – चंद्रशेखर राव

तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी शनिवारी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन राज्याला विशेष दर्जा देण्याची मागणी केली.

| October 12, 2014 02:08 am

तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी शनिवारी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन राज्याला विशेष दर्जा देण्याची मागणी केली.
तेलंगणाला विशेष दर्जा द्यावा या मागणीचे समर्थन करण्यासाठी तेलंगणच्या मागासलेपणाचा मुद्दा या वेळी उपस्थित करण्यात आला, असे तेलंगण राष्ट्र समितीचे नेते बी. विनोदकुमार यांनी वार्ताहरांना सांगितले.
तेलंगणमधील दहापैकी आठ जिल्हे मागासलेले असल्याचे नियोजन आयोगाने जाहीर केले आहे. त्यामुळेच तेलंगणला विशेष राज्याच्या दर्जा देणे महत्त्वाचे आहे, असेही विनोदकुमार म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2014 2:08 am

Web Title: chandra sekhar rao demands special status for telangana
टॅग : Telangana
Next Stories
1 मलालास नोबेल मिळाल्याने पाकिस्तानी तालिबानचा थयथयाट
2 शरीफ यांना अपात्र ठरविण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली
3 रिलायन्सच्या संचालक मंडळावर मुकेश अंबानी यांची कन्या व पुत्र
Just Now!
X