27 February 2021

News Flash

फ्रान्सच्या नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाने इस्रोवर दाखवला विश्वास, म्हणाले…

भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जिंकणाऱ्या शास्त्रज्ञाने इस्रोबद्दल मांडले मत

सर्जे हरोशे

भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) नक्कीच विक्रम लँडरमधील समस्या सोडवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करतील असा विश्वास नोबेल पुरस्कार विजेते भौतिकशास्त्रज्ञ सर्जे हरोशे यांनी व्यक्त केले आहे. मूळचे फ्रान्सचे असणाऱ्या सर्जे यांनी बुधवारी भारताच्या ‘चांद्रयान २’ मोहिमेबद्दल आपले मत व्यक्त केले. ‘विक्रम लँडरबरोबर नक्की काय झाले मला ठाऊक नाही पण इस्रो नक्कीच ही तांत्रिक अडचण सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल,’ असा विश्वास सर्जे यांनी व्यक्त केला आहे. म्हणजेच इस्रो पुन्हा विक्रम लँडरशी संपर्क साधण्यात यशस्वी होईल असा विश्वास सर्जे यांनी व्यक्त केला आहे.

२०१२ साली भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जिंकणाऱ्या सर्जे यांनी इस्रोवर आपला पूर्ण विश्वास असून ते नक्कीच विक्रम लँडरसंदर्भातील समस्येवर उपाय शोधतील असं म्हटलं आहे. ‘विज्ञान कायमच मानवाला आश्चर्याचे धक्के देते. विज्ञानाच्या क्षेत्रात कधी मानवाला यश मिळते तर कधी अपयश. त्यामुळेच या क्षेत्रात काम करताना कायम आशावादी रहायला हवे,’ असं मत सर्जे यांनी व्यक्त केले आहे. ‘एखाद्या ठाऊक नसलेल्या गोष्टीचा शोध घेणे म्हणजे विज्ञान. त्यामुळे या क्षेत्रात सतत वेगवेगळी माहिती आणि धक्के मिळत असतात. कधी हे धक्के सुखद असतात तर कधी निराशा करणारे. या क्षेत्रात अपयशही अनेकदा येते. त्यामुळेच या क्षेत्रात काम करणाऱ्यांना येथील अपयशाची जाणीव असायला हवी असं मत सर्जे यांनी व्यक्त केले आहे. ‘विज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते. त्यामुळे या क्षेत्रात अर्थिक तशीच राजकीय गोष्टींचाही विचार करायला हवा. पण त्याचे समिकरण कसे असावे ते मला ठाऊक नाही,’ असंही सर्जे यांनी सांगितले.

‘भारताच्या ‘चांद्रयान २’ मोहिमेची चर्चा भरपूर झाली. त्यामुळे अनेकांना या मोहिमेबद्दल ठाऊक होते. म्हणूनच या मोहिमेकडून सर्वांनाच खूप जास्त अपेक्षा होत्या. त्यामुळेच लँडरशी संपर्क तुटल्यानंतर इस्रोचे वैज्ञानिक जास्त निराश झालेले दिसले,’ असं मतही सर्जे यांनी मांडले. पंजाबमधील मोहाली येथील राष्ट्रीय कृषी-खाद्य जैव तंत्रज्ञान संस्थेमधील ‘नोबेल पारितोषिक सिरीज भारत २०१९’ या कार्यक्रमामध्ये सर्जे बोलत होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 12, 2019 1:29 pm

Web Title: chandrayaan 2 nobel laureate serge haroche says isro will solve the complication with moon lander scsg 91
Next Stories
1 जम्मू काश्मीर-पंजाब सीमारेषेवर तीन दहशतवाद्यांना अटक, सहा AK-47 जप्त
2 जगाचा आमच्यावर विश्वास राहिलेला नाही; पाकिस्तानी मंत्र्याने व्यक्त केली खंत
3 MDH च्या मसाल्यामध्ये अढळले घातक जीवाणू, अमेरिकेने परत पाठवले मसाले
Just Now!
X