News Flash

चंद्रावर ‘प्रज्ञान रोव्हर’ अजून सुस्थितीत? फोटोंवरुन समोर आली नवीन माहिती

चंद्रावरील सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न अयशस्वी झाल्याच्या जवळपास १० महिन्यांनंतर समोर आली नवीन माहिती...

(फोटो सौजन्य - @Ramanean)

चांद्रयान-२ मोहिमेअंतर्गत ‘प्रज्ञान रोव्हर’ला घेऊन रवाना झालेल्या ‘विक्रम लँडर’चा चंद्रावरील सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न अयशस्वी झाला होता. . जवळपास १० महिन्यांनंतर आता त्याबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे.

गेल्या वर्षी ‘नासा’च्या फोटोंचा वापर करुन विक्रमचा ढिगारा(डेब्रिस) ओळखणारे चेन्नईचे इंजिनिअर शनमुग सुब्रमण्यन यांनी इस्त्रोला एक ईमेल पाठवून प्रज्ञान रोव्हर काही मीटर पुढे सरकल्याचा दावा केला आहे. भारतीय अवकाश संस्था इस्त्रोला पाठवलेल्या ई-मेलमध्ये शनमुग सुब्रमण्यन यांनी ‘नासा’ने मे महिन्यात जारी केलेल्या फोटोंवरुन प्रज्ञान काही मीटर पुढे आल्याचे संकेत मिळाले असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, यावर इस्त्रोचे प्रमुख के. सिवन यांचीही प्रतिक्रिया आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना त्यांनी, “आम्हाला याबाबत अजून नासाकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही. पण, ज्या व्यक्तीने विक्रमचा ढिगारा ओळखला होता, त्याने आम्हाला याबाबत ई-मेल केला आहे. आमचे तज्ज्ञ त्यावर अभ्यास करत आहेत, पण आताच याबाबत काहीही सांगता येणार नाही”,अशी माहिती दिली आहे.


तर, “४ जानेवारीच्या फोटोंवरुन(मे महिन्यात जारी झालेल्या) प्रज्ञान लँडर अजून शाबूत असून काही मीटर पुढे सरकल्याचं दिसतं. रोव्हर पुढे कसा सरकला असेल हे समजणं गरजेचं आहे, इस्त्रो याबाबत नेमकी माहिती देईल अशी अपेक्षा आहे”, असं शनमुगा म्हणाले. तसेच, इस्त्रोकडून ( ग्राउंड टीमकडून) पाठवण्यात आलेल्या काही ‘ब्लाइंड’ कमांड्स प्रज्ञानने फॉलो केल्याची शक्यताही त्यांनी वर्तवली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2020 8:47 am

Web Title: chandrayaan 2 rover intact pragyan vikram chennai techie tip off isro nasa sas 89
Next Stories
1 भूमिपूजन अडवाणींविना?
2 पतहमी योजनेचा विस्तार
3 ‘टिकटॉक’वर बंदीचे ट्रम्प यांचे सूतोवाच 
Just Now!
X