अन्य क्षेत्रांप्रमाणे करोना व्हायरसच्या साथीचा अवकाश कार्यक्रमाला सुद्धा फटका बसला आहे. करोनामुळे भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) चांद्रयान-३ मोहिमेला विलंब झाला आहे. २०२१ च्या सुरुवातीला चांद्रयान-३ मोहिम लाँच होऊ शकते.

“२०२१ या वर्षाच्या सुरुवातीला चांद्रयान-३ चंद्राच्या दिशेने झेपावेल. चांद्रयान-२ सारखी चांद्रयान-३ मोहिम असेल. चांद्रयान-२ प्रमाणे चांद्रयान-३ तीन मोहिमेत लँडर, रोव्हर असेल पण ऑर्बिटर नसेल” केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी स्टेटमेंटमध्ये ही माहिती दिली. सध्या चांद्रयान-२ चा ऑर्बिटर चंद्रभोवती भ्रमण करत आहे. या ऑर्बिटरच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती वैज्ञानिकांना मिळत आहे.

S Somnath
चांद्रयान ४ मोहिमेबाबत इस्रोच्या प्रमुखांकडून मोठी अपडेट; म्हणाले “पुढील टप्पा…”
chandrachud (1)
“लैंगिक भेदभाव संपवा, स्त्रियाही खोल समुद्रात जाऊ शकतात”, कोस्ट गार्डप्रकरणी सुप्रिम कोर्टाने केंद्राला फटकारले
chip manufacturing infrastructure
पोस्टाच्या तिकिटाएवढी दिसणारी सेमीकंडक्टर चिप नक्की कशी तयार होते?
Somalias Pirates Stock Market in Harardhere
वित्तरंजन : भांडवली बाजारच; पण कुणाचा?

मागच्यावर्षी २०२० मध्ये चांद्रयान तीन मोहिम लाँच होईल अशी माहिती मंत्र्यांनी दिली होती. गेल्यावर्षी सात सप्टेंबरला विक्रम लँडर चंद्रावर कोसळल्यानंतर इस्रोने चांद्रयान-३ ची घोषणा केली होती.

आणखी वाचा- मोठी झेप! DRDO कडून हायपरसॉनिक टेक्नोलॉजीची यशस्वी चाचणी, शत्रूला कळण्याआधीच होणार प्रहार

जाधवपूर विद्यापीठाच्या दोन संशोधकांकडे महत्त्वाची जबाबदारी
जाधवपूर विद्यापीठाचे दोन संशोधक इस्रोच्या चांद्रयान ३ मोहिमेत चंद्रावरील सॉफ्ट लँडिंगच्या प्रोजेक्टवर काम करत आहेत. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग करण्याचा भारताचा संकल्प आहे. आतापर्यंतच्या चंद्र मोहिमांमध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा कोणीही अभ्यास केलेला नाही.

जाधवपूर विद्यापीठाचे दोन संशोधक सयान चॅटर्जी, डॉ. अमितवा गुप्ता इस्रोसोबत चंद्रावरील लँडिंगच्या प्रोजेक्टवर काम करत आहेत. पीटीआयने हे वृत्त दिले आहे. चंद्रावरील प्रत्यक्ष लँडिंगच्यावेळी कशी स्थिती असेल तो विचार करुन सिम्युलेशन मॉडेलवर ते काम करत आहेत. “लँडरचे चंद्राच्या पृष्ठभागावर क्रॅश लँडिंग न होता, पंखाप्रमाणे सॉफ्ट लँडिंग कसे होईल, त्यावर काम सुरु आहे” असे सयान चॅटर्जी यांनी सांगितले. ते इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन सहाय्यक प्राध्यापक आहेत.

पावर इंजिनिअरींग विभागाचे प्राध्यापक डॉ. अमितवा गुप्ता म्हणाले की, ‘चंद्रावर व्यवस्थित लँडिंग कसे होईल त्या दृष्टीने आम्ही संशोधन करत आहोत. लँडरची हालचाल, त्याचे फिरणे आणि अचानक त्याला वेग प्राप्त होऊ नये. त्या दृष्टीने संशोधन सुरु आहे’. हा प्रकल्प फक्त चांद्रयान मोहिमेपुरता मर्यादीत नाही तर सॉफ्ट लँडिंगचे हे तंत्रज्ञान इस्रोला दुसऱ्या ग्रहांवरील मोहिमांमध्ये उपयोगी ठरु शकते असे अमितवा गुप्ता म्हणाले.