News Flash

दिल्लीत सचिवालयाबाहेर भरला जनता दरबार

दिल्लीचे नवे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (शनिवार) सकाळी सचिवालयाबाहेरच सामान्य जनेतचा जनता दरबार भरविला.

| January 11, 2014 11:41 am

दिल्लीचे नवे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (शनिवार) सकाळी सचिवालयाबाहेरच सामान्य जनेतचा जनता दरबार भरविला. नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडविण्यासाठी केजरीवाल सरकारकडून हा पहिला जनता दरबार भरविण्यात आला होता.
आपल्या समस्या मांडण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांचा जमाव सचिवालयाबाहेर आला होता. जनता दरबारामुळे सचिवालयाकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते. सचिवालयाबाहेर रस्त्यावर येऊन सर्व  मंत्र्यांनी जनतेच्या समस्या ऐकल्या. सकाळी साडेनऊ ते साडेअकरा असा जनता दरबार भरविण्यात आला होता. केजरीवाल यांनी आता दर शनिवारी सचिवालयाबाहेर जनता दरबार भरणार असल्याचेही यावेळी सांगितले. मात्र अत्यंत ढिसाळ नियोजनामुळे या दरबारात सर्वत्र गोंधळाचे वातावरण दिसत होते. त्यामुळे केजरीवाल मध्यावरच उठून निघून गेले. मात्र थोड्या वेळाने परत येऊन त्यांनी नागरिकांची माफी मागत पुढील वेळी योग्य नियोजन करण्यात येईल असे आश्वासन दिले.
सामाजिक तक्रार ही दुसरी प्रमुख समस्या असून, कोणत्याही सरकारसमोर ही मोठी समस्या आहे.  त्या तक्रारी सोडविणे हे प्रत्येक सरकारचे कर्तव्य आहे, असे केजरीवाल शुक्रवारी म्हणाले होते . 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2014 11:41 am

Web Title: chaos at arvind kejriwals janata darbar as thousands arrive at secretariat with their grievances
Next Stories
1 दाऊद पाकिस्तानात नसल्याचा पाकचा कांगावा
2 शिक्षणासाठी मोदींचा ‘हेड, हार्ट आणि हँड’ चा नारा!
3 ‘आदर्श’वर प्रश्न विचारणारे जातीयवादी
Just Now!
X