News Flash

यंदाची चारधाम यात्रा रद्द; करोनाच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय

फक्त पुजाऱ्यांना पूजाअर्चा करण्याची परवानगी

(Photo: Facebook/TirathSRawat)

देशात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर उत्तराखंड सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या वर्षीची चारधाम यात्रा आता रद्द करण्यात आली आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंग रावत यांनी ही माहिती दिली आहे.

चार मंदिरांमध्ये फक्त त्या त्या मंदिराचे पुजारी पुजा आणि इतर धार्मिक विधी करतील, इतर कोणालाही या मंदिरांमध्ये प्रवेश असणार नाही, अशी माहितीही त्यांनी दिली. आज या संदर्भात एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तराखंड पर्यटन विकास परिषदेच्या सभागृहात पर्यटन मंत्री सतपाल महाराज यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली.

बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या चार ठिकाणच्या मंदिरातले पुजारीच फक्त इथली पूजाअर्चा आणि इतर धार्मिक विधी करतील. पुढच्या महिन्याच्या १४ तारखेपासून ही यात्रा सुरु होणार होती.

गेल्या वर्षीसुद्धा करोनाच्या प्रादुर्भावामुळे ही यात्रा रद्द करण्यात आली होती. जुलैपासून सरकारने अंशतः परवानगी दिली होती. मात्र, करोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आता ही यात्रा रद्द करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 29, 2021 12:21 pm

Web Title: chardham yatra is cancelled said teerath singh rawat cm uttarakhand vsk 98
Next Stories
1 Covid: “तात्काळ भारत सोडा,” अमेरिकेचा नागरिकांना संदेश
2 “लोक मरत रहावेत असंच तुम्हाला वाटतं असल्याचं दिसतंय”; रेमडेसिविर धोरणावरुन न्यायालयाने केंद्राला सुनावलं
3 रुग्णसंख्येचा विस्फोट! देशात गेल्या २४ तासांत आढळले ३ लाख ७९ हजार रुग्ण; ३६४५ मृत्यू
Just Now!
X