04 March 2021

News Flash

बनावट पासपोर्टप्रकरणी छोटा राजनविरुद्ध आरोपपत्र

छोटा राजन याला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले

| June 9, 2016 01:51 am

छोटा राजन

बनावट पासपोर्ट प्रकरणी विशेष न्यायालयाने बुधवारी कुख्यात गँगस्टर छोटा राजन आणि अन्य तिघांविरोधात फसवणूक, खोटी सही करणे आणि गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचणे आदी आरोप ठेवले.
छोटा राजन याला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले तेव्हा विशेष सीबीआय न्यायाधीश विनोदकुमार यांनी वरील आदेश दिला. तीन सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने छोटा राजन याने मोहनकुमार या नावाने पासपोर्ट मिळविल्याबद्दल राजन याच्याविरुद्ध आरोप ठेवण्यात आले आहेत. सदर तीन सरकारी अधिकारीही या प्रकरणातील आरोपी आहेत.
या प्रकरणाची सुनावणी ११ जुलैपासून दररोज होणार आहे, राजन हा अनेक दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत आहे त्यामुळे सुनावणी दररोज घेण्यात यावी, असे न्यायाधीशांनी म्हटले आहे.
राजन याच्यासमवेत तीन माजी सरकारी अधिकारी जयश्री दत्तात्रेय रहाटे, दीपक नटवरलाल शहा आणि ललिता लक्ष्मणन यांच्याविरोधातही सुनावणी होणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वयेही आरोप ठेवण्यात आले आहेत.
सुनावणी सुरू असताना राजन याच्या वतीने त्याची नमुना स्वाक्षरी घेण्याबाबतचा अर्ज करण्यात आला त्याला न्यायालयाने मान्यता दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2016 1:51 am

Web Title: charges framed against gangster chhota rajan in fake passport case
टॅग : Chhota Rajan
Next Stories
1 शांतता निर्देशांकात भारताचा १४१ वा क्रमांक
2 आकाशगंगेतील जुन्या ताऱ्यांच्या आवाजांची स्पंदने टिपण्यात यश
3 प्रत्युषाच्या मृत्यूची सीबीआय चौकशी
Just Now!
X