काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणूक जिंकणारे आमदार एन ए हारिस यांचा मुलगा मोहम्मद नालापद हारिस याच्या अडचणी वाढल्या आहेत. आमदाराच्या मुलावर दोन महिन्यांपुर्वी एल विद्वत नावाच्या एका तरुणाला बंगुळुरुमधील कॅफेत मारहाण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी क्राइम ब्रांच तपास करत होती. पोलिसांनी याप्रकरणी चार्जशीट दाखल केली असून नालापद याच्यावर आरोप लावण्यात आला आहे की, त्याने विद्वत याला फक्त मारहाण केली नाही तर आपल्या साथीदारांना हत्येसाठी उसकवलं होतं.

पोलिसांना चार्जशीटमध्ये सांगितलं आहे की, १९ मार्च २०१८ रोजी बंगळुरुमधील युबी सिटी येथील कॅफेत दोघांचं भांडण झालं. नालापद याचा पाय विद्वतला लागला या क्षुल्लक कारणावरुन हे भांडण झालं. विद्वत याच्या पायाला प्लास्टर लावण्यात आलं होतं. आरोप आहे की, नालापद याने विद्वत याला फक्त शिवीगाळ केली नाही तर आपला पाय चाटण्यासही सांगितलं. रिपोर्टनुसार, नालापद याने विद्वतला, आपण आमदार एन ए हारिस यांचा मुलगा आहोत. तू माझ्या बुटाच्याही लायकीचा नाही आहेस. तू माझी माफी माग आणि माझे बूट चाटून साफ कर’, अशी धमकी दिली.

Sexual abuse of young woman by pretending treatment case filed against self-proclaimed doctor in Nalasopara
उपचाराच्या नावाखाली तरुणीवर लैंगिक अत्याचार, नालासोपार्‍यात स्वयंघोषित वैद्याविरोधात गुन्हा दाखल
Patna High court
मुलांसाठी पत्नीच्या पालकांकडून पैसे मागणे हा हुंड्याचा प्रकार नाही; उच्च न्यायालयाचा पतीला दिलासा
Rape of accused wife
चंद्रपूर : रक्षक नव्हे राक्षसच! पोलीस हवालदाराचा आरोपीच्या पत्नीवर बलात्कार; पोलीस प्रशासनात खळबळ
Pune, NCP Office bearers, Son, Attacked, Gang, koyata, Dandekar Pool, Six Arrested, crime news, police, politics
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याच्या मुलावर हल्ला; दांडेकर पूल परिसरातील घटना, सहाजणांना अटक

चार्जशीटनुसार, जेव्हा विद्वतने असं करण्यास नकार दिला तेव्हा नालापद आणि त्याच्या साथीदारांनी त्याच्यावर काचेच्या बाटल्या, बर्फाच्या बादल्या आणि इतर साहित्यांच्या सहाय्याने मारहाण केली. नालापद आणि त्याचे मित्र अर्धमेला होईपर्यंत मारहाण करत होते. आपण मारुन टाकू अशी धमकीही दिल्याचा आरोप आहे. “जर तू माफी मागितली नाहीस, तर तुला इथेच मारुन टाकेन”, अशी धमकी नालापदने दिली होती.

पोलिसांनी याप्रकरणी तक्रारदार प्रवीण वेंकटाचलैया यांच्यासहित २३ साक्षीदारांची साक्ष नोंदवली आहे. नालापद याच्यासहित अन्य सात आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलं आहे. घटनेच्या तीन महिन्यानंतरही इतर आरोपी कृष्णा आणि जवर यांचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेची बंगळुरुमध्ये चांगलीच चर्चा झाली. मात्र या वादाचा कोणताही परिणाम आमदार एन ए हरीस यांच्या लोकप्रियतेवर झालेला नाही. या वादानंरही आमदार हारिस सलग तिसऱ्यांदा निवडून आले.