व्हिसाच्या अटींचे उल्लंघन करून दिल्लीच्या निझामुद्दीन मर्कझ येथील धार्मिक मेळाव्यात सहभागी झाल्याबद्दल, बेकायदेशीरीत्या धर्मप्रचाराच्या उपक्रमांत भाग घेतल्याबद्दल आणि देशात करोनाचा प्रादुर्भाव झाल्याच्या पाश्र्वभूमीवर सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा भंग केल्याबद्दल दिल्ली पोलिसांनी मंगळवारी ८२ विदेशी नागरिकांविरुद्ध आरोपपत्र सादर केले.

पोलिसांनी २० देशांच्या नागरिकांविरुद्ध २० आरोपपत्रे दाखल केले असून, आरोपपत्रांवर विचार करण्यासाठी महानगर दंडाधिकारी सायमा जमील यांनी हे प्रकरण १२ जूनला ठेवले आहे.

आरोपपत्रात नमूद केल्यानुसार, आरोपींपैकी चौघे अफगाणिस्तानातील, ब्राझील व चीनमधील प्रत्येकी ७, अमेरिकेतील ५, ऑस्ट्रेलिया, कझाकस्तान, मोरोक्को व ब्रिटन येथील प्रत्येकी ५, अल्जेरियातील ८, सौदी अरेबियातील १०, फिजीतील १४, सुदान व फिलिपाइन्समधील प्रत्येकी ६ आणि युक्रेन, इजिप्त, रशिया, जॉर्डन, फ्रान्स, टय़ुनिशिया व बेल्जियम येथील प्रत्येकी १ आरोपी आहे.