चीनमध्ये डॉक्टरांनी एका व्यक्तीच्या गुप्तांगातून चक्क ३ फूट लांब मोबाइलच्या चार्जरची केबल काढून त्याचा जीव वाचवला. या व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये केबल अडकली होती. त्यानंतर डॉक्टरांनी लेझर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शस्त्रक्रिया करुन ती केबल काढली. या व्यक्तीला शरीराला आलेली खाज सहन न झाल्याने त्याने कोणताही विचार न करता धोकादायक पाऊल उचललं होतं.

Kankan News ने दिलेल्या वृत्तानुसार, ३० मार्च रोजीची ही घटना आहे. ६० वर्षांच्या या व्यक्तीला लघवीच्या मार्गात अचानक खाज आली. त्याने काहीही विचार न करता खाजवण्यासाठी मोबाइलच्या केबलचा वापर केला. त्यानंतर केबल त्या व्यक्तीच्या मूत्राशयात अडकली. त्याने खेचून वायर काढण्याचा प्रयत्न केला तर रक्तस्त्राव सुरू झाला. रक्त पाहताच हा व्यक्ती घाबरला. तातडीने तो रुग्णालयात पोहोचला. डॉक्टरांनी उपचाराला सुरूवात केली, तर ०.२ इंच जाड आणि ३ फूट लांब केबल वायर या व्यक्तीच्या लघवीच्या मार्गामध्ये अडकल्याचं लक्षात आलं. डॉक्टरांनी लेझर तंत्रज्ञानाने त्याच्या शरीरातून ती वायर बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आणि अखेर यशस्वीपणे ती वायर डॉक्टरांनी बाहेर काढली. या व्यक्तीच्या प्रकृतीला आता धोका नसून तो डॉक्टरांच्या निगराणीखाली आहे.