News Flash

व्हॉट्स अॅप ग्रुपवर निर्मला सीतारामन यांची हत्या करण्यासंदर्भात चॅटिंग, दोघांना अटक

दोन जण व्हॉट्स अॅपवरील एका ग्रुपवर सीतारामन यांची हत्या करण्यासंदर्भात चर्चा करत असल्याची माहिती उत्तराखंड पोलिसांना रविवारी रात्री मिळाली.

एका तरुणाने व्हॉट्स अॅप वरील चॅटिंग दरम्यान, मी सीतारामन यांच्यावर गोळी झाडणार. उद्या सीतारामन यांचा शेवटचा दिवस असेल, असे म्हटले होते.

संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांची हत्या करण्यासंदर्भात व्हॉट्स अॅपवरील ग्रुपवर चॅटिंग करणाऱ्या दोन जणांना उत्तराखंड पोलिसांनी अटक केली. दारूच्या नशेत असताना दोघांमध्ये व्हॉट्स अॅपच्या ग्रुपवर सीतारामन यांच्या हत्येबाबत संभाषण झाले. याची माहिती मिळताच पोलिसांनी दोन्ही तरुणांना अटक केली.

संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन या सोमवारी उत्तराखंड दौऱ्यावर होत्या. या पार्श्वभूमीवर दोन जण व्हॉट्स अॅपवरील एका ग्रुपवर सीतारामन यांची हत्या करण्यासंदर्भात चर्चा करत असल्याची माहिती उत्तराखंड पोलिसांना रविवारी रात्री मिळाली. पोलिसांनी वेगाने सूत्र हलवत दोन्ही तरुणांना अटक केली. यातील एका तरुणाने व्हॉट्स अॅप वरील चॅटिंग दरम्यान, मी सीतारामन यांच्यावर गोळी झाडणार. उद्या सीतारामन यांचा शेवटचा दिवस असेल, असे म्हटले होते.

पोलिसांनी दोघांविरोधात आयटी अॅक्ट आणि भारतीय दंड विधानातील अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. दोघांना अटक करण्यात आली असून त्यांनी दारूच्या नशेत हे विधान केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. दोघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, त्यांनी गेल्या काही दिवसात शस्त्रत्रांची खरेदी केली होती का , या गोष्टीही तपासून बघत आहोत, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.व्हॉट्स अॅपवरील ज्या ग्रुप मध्ये दोघे गप्पा मारत होते त्याची देखील चौकशी केली जाणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2018 10:27 am

Web Title: chat in whatsapp group about killing defence minister nirmala sitharaman two arrested uttarakhand
Next Stories
1 तृतीयपंथीयाशी प्रेमसंबंध, वडिलांची मारहाण अन् जमावासमोर कपडे उतरवून हंगामा !
2 जेएनयूत तणाव, दोन गट भिडले ; सुरक्षा वाढवली
3 अजय माकन यांचा दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा ?
Just Now!
X