News Flash

छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी योगी आदित्यनाथांचे घेतले आशीर्वाद

अर्ज दाखल करण्यापूर्वी रमणसिंह आणि त्यांचा मुलगा अभिषेक यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे पाया पडत 'मिशन ६५' साठी आशीर्वाद घेतले.

छत्तीसगढ़चे मुख्यमंत्री डॉ. रमणसिंह यांनी मंगळवारी राजनांदगाव येथून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करण्यापूर्वी रमणसिंह आणि त्यांचा मुलगा अभिषेक सिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे पाया पडत 'मिशन ६५' साठी आशीर्वाद घेतले.

छत्तीसगढ़चे मुख्यमंत्री डॉ. रमणसिंह यांनी मंगळवारी राजनांदगाव येथून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करण्यापूर्वी रमणसिंह आणि त्यांचा मुलगा अभिषेक सिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे पाया पडत ‘मिशन ६५’ साठी आशीर्वाद घेतले. अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी राजनांदगाव आणि राज्यातून भाजपाला नेहमी प्रेम मिळत आले असून यापुढेही ते मिळत राहणार असल्याचे म्हटले. छत्तीसगडची निवडणूक संपूर्ण देशासाठी अत्यंत महत्वाची असून यावेळीही आम्ही संपूर्ण बहुमताने सरकार स्थापन करुन असा विश्वास माध्यमांसमोर व्यक्त केला.

योगी आदित्यनाथ यांचा आशीर्वाद सर्व उमेदवारांना मिळणार असल्याचे ते म्हणाले. काँग्रेसकडून माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतणी करुणा शुक्ला या रमणसिंह यांच्याविरोधात उभ्या आहेत. याबाबत रमणसिंह यांनी आपल्याला कोणतीही अडचण नसल्याचे म्हटले.

माध्यमांशी चर्चा केल्यानंतर रमणसिंह यांनी योगी आदित्यनाथ आणि कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस आहे. १२ नोव्हेंबर रोजी मतदान तर ११ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2018 5:43 pm

Web Title: chattisgarh assembly elections 2018 cm raman singh touches the feet of up cm yogi adityanath
Next Stories
1 इंदिरा गांधी विद्यालय सोडलं कारण… -देवेंद्र फडणवीस
2 अबब! चीनच्या समुद्रावर जगातल्या सर्वात मोठ्या पुलाची बांधणी
3 CBI चे विशेष संचालक अस्थानांना हायकोर्टाचा दिलासा, कारवाई न करण्याचे निर्देश
Just Now!
X