04 July 2020

News Flash

जॅक्स डबोके, ओकाईम फ्रँक, मायकल हेंडरसन या तिघांना रसायनशास्त्राचे नोबेल

रसायनशास्त्रातील महत्त्वाच्या योगदानाबाबत सर्वोच्च सन्मान

जॅक्स डबोके, ओकाईम फ्रँक, मायकल हेंडरसन या तिघांनाही यंदा रसायनशास्त्राचे नोबेल जाहीर करण्यात आले आहे. पदार्थांच्या जैव रेणूंची रचना पाहण्यासाठी क्रायो-इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी विकसित करण्यासाठी या तिघांनी जे योगदान दिले त्याचमुळे हे नोबेल त्यांना दिले जात असल्याचे नोबेल समितीने म्हटले आहे.

जगातील सर्वोच्च सन्मान म्हणून नोबेल या पुरस्काराची ओळख आहे. मंगळवारी पदार्थ विज्ञान क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाले, त्यानंतर बुधवारी रसायन शास्त्रातील पुरस्कार जाहीर करण्यात आले. ‘हिंदुस्थान टाइम्स’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे. डबोके, फ्रँक आणि हेंडरसन या तिघांनी पदार्थाच्या जैव रेणूंची रचना पाहण्यासाठी क्रायो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी विकसित करण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले. या तिघांच्या या महत्त्वाच्या संशोधनामुळे जैवरेणू गोठवून त्यांचा अभ्यास करणे हे संशोधकांना सोपे जाणार आहे.

१९०१ पासून आजवर रसायनशास्त्रासाठी १०९ नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आले असून यामध्ये १७० पेक्षा जास्त वैज्ञानिकांचा समावेश करण्यात आला आहे. ज्यांच्या नावे नोबेल पुरस्कार दिला जातो ते आल्फ्रेड नोबेल हे रसायनशास्त्रज्ञच होते. फ्रेडरिक सँगर या ब्रिटीश बायोकेमिस्टला १९५० ते १९८० या दरम्यान दोनवेळा नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. साहित्यातील नोबेल ५ ऑक्टोबर रोजी आणि शांततेचे नोबेल ६ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती नोबेल समितीने दिली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2017 5:34 pm

Web Title: chemistry nobel awarded to jacques dubochet joachim frank and michael henderson
Next Stories
1 …अन् हनीप्रीत न्यायालयात रडली
2 मोदींवर टीका करणारे अभिनेते प्रकाश राज यांच्याविरोधात खटला दाखल
3 पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी करा; केंद्र सरकारचे राज्यांना आवाहन
Just Now!
X