30 September 2020

News Flash

गिर्यारोहक छंदा गयेन मृत्युमुखी?

कांचनजुंगाजवळचे शिखर सर करण्यासाठी गेलेल्या पश्चिम बंगालच्या महिला गिर्यारोहक छंदा गयेन (३५) आणि त्यांच्यासमवेत असलेल्या अन्य दोन शेर्पा गिर्यारोहकांचा मृत्यू झाल्याचे नेपाळच्या पोलिसांनी सांगितले

| May 23, 2014 04:07 am

कांचनजुंगाजवळचे शिखर सर करण्यासाठी गेलेल्या पश्चिम बंगालच्या महिला गिर्यारोहक छंदा गयेन (३५) आणि त्यांच्यासमवेत असलेल्या अन्य दोन शेर्पा गिर्यारोहकांचा मृत्यू झाल्याचे नेपाळच्या पोलिसांनी सांगितले. मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली असावी, असा अंदाज आहे.
    हे तिघेजण कांचनजुंगाजवळील यालुंग कांग हे शिखर सर करण्यासाठी जात असताना हिमवृष्टी होऊन कडे कोसळल्यामुळे मंगळवारपासून बेपत्ता होते.
हे सर्वजण सुमारे ७,३०० मीटर उंचीवर पोहोचले असताना अचानक हवामान खराब होऊन मोठय़ा प्रमाणावर हिमवर्षांव झाला आणि त्याखालीच ते गाडले गेले, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. खराब हवामानामुळेच त्यांचे मृतदेह शोधण्याचे प्रयत्नही असफल ठरत आहेत.
तेंबा शेर्पा (२४) व दावा वांजू शेर्पा (२८) अशी अन्य दोन गिर्यारोहकांची नावे आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2014 4:07 am

Web Title: chhanda gayen 2 sherpas killed on kanchenjunga
Next Stories
1 ‘फेसबुक’मुळे दोघांचे बळी
2 चीन : दहशतवादी हल्ल्यांत ३२ ठार
3 क्रांतीच्या घोषणेनंतर थायलंडच्या लष्कराकडून राष्ट्रव्यापी संचारबंदी
Just Now!
X