25 September 2020

News Flash

छत्तीसगढमध्ये नक्षली हल्ल्यात १३ जवान शहीद

छत्तीसगढमधील सुकना जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) १३ जवान शहीद झाले.

| December 1, 2014 06:40 am

छत्तीसगढमधील सुकना जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) १३ जवान शहीद झाले. यामध्ये दोन अधिकाऱयांचाही समावेश आहे. गावकऱयांच्या आडोशाला लपून नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामध्ये १३ जवान शहीद झाले. शहीद झालेले सर्वजण सीआरपीएफच्या २२३ बटालियनचे जवान होते. यामध्ये एका डेप्युटी कमांडंट आणि असिस्टंट कमांडंटचाही समावेश आहे. या हल्ल्यानंतर अतिरिक्त पोलीस बळ घटनास्थळी पाठविण्यात आले असून, वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
(संग्रहित छायाचित्र)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 1, 2014 6:40 am

Web Title: chhattisgarh 13 crpf personnel killed in maoist ambush
Next Stories
1 पेट्रोल, डिझेल स्वस्त
2 पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन
3 नरेंद्र मोदी चक्रव्यूह भेदतील सरसंघचालकांना विश्वास
Just Now!
X