News Flash

नक्षलवाद्यांनी अपहरण केलेल्या जवानाचा आढळला मृतदेह

होळी नंतर हा जवान आपल्या घरी अरगट्टा या गावी गेला होता.

प्रातिनिधीक छायाचित्र

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यामधील अरगट्टा गावातील दोरनापाल पोलीस ठाणे क्षेत्रात बुधवारी रात्री डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड(डीआरजी)च्या एका जवानाचा मृतदेह आढळून आला.

अरगट्टा गावातील दोरनापाल पोलीस ठाणे क्षेत्रातून नक्षलवाद्यांनी या जवानाचे अपहरण केले होते. त्यानंतर बुधवारी रात्री त्याचा मृतदेह या परिसरात आढळून आला आहे. ११ मार्च रोजी होळी नंतर हा जवान आपल्या घरी अरगट्टा या गावी गेला होता. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2020 10:19 am

Web Title: chhattisgarh a dist reserve guard drg jawan was found dead msr 87
Next Stories
1 ज्योतिरादित्य शिंदेंच्या राजीनाम्यावर अखेर सचिन पायलट बोलले
2 “…मग बहिणीसोबत लग्न लावून द्या”, नवरीमुलगी प्रियकरासोबत फरार होताच नवऱ्यामुलाची मागणी
3 “ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितल्यास मी विहिरीतही उडी मारेन”
Just Now!
X