छत्तीसगडमधील बीजापूर येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत १० नक्षलवाद्यांना कंठस्नान घातल्याचे वृत्त आहे. घटनास्थळावरुन शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे.
बीजापूर येथील जंगलात नक्षलवाद्यांचे प्रशिक्षण तळ असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. गुरुवारी सकाळी सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम राबवली. यादरम्यान दबा धरुन बसलेल्या नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. सुरक्षा दलांनीही चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत १० नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. घटनास्थळावरुन शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 7, 2019 12:58 pm