News Flash

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांसोबत चकमकीत सीआरपीएफचे दोन जवान शहीद

चकमकीदरम्यान झालेल्या गोळीबारात एका गावकऱ्याचाही मृत्यू झाला आहे

संग्रहित

छत्तीसगडमधील बिजापूर येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान (सीआरपीएफ) आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत सीआरपीएफचे दोन जवान शहीद झाले आहेत. चकमकीदरम्यान झालेल्या गोळीबारात एका गावकऱ्याचाही मृत्यू झाला आहे. सुरक्षा जवानांची एक टीम सीआऱपीएफच्या मदतीसाठी पाठवण्यात आली आहे. शहीद झालेला एक जवान सीआरपीएफच्या १९९ बटालियनमधील होता.

दरम्यान दुसऱ्या एका ऑपरेशनदरम्यान सुरक्षा जवानांनी नक्षलवादी तळ नष्ट केला. महाराष्ट्राच्या सीमालगत असणाऱ्या छत्तीसगमधील राजनंदगाव येथे चकमकीदरम्यान जवनांनी ही कारवाई केली. इंडो-तिबेटियन सीमा पोलिसांच्या (आयटीबीपी) २७ व्या बटालियनकडून ही कारवाई करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2019 1:11 pm

Web Title: chhattisgarh bijapur maoist encounter crpf jawan sgy 87
Next Stories
1 वाचा मुस्लीम ड्रायव्हर व तस्लिमा नासरीन यांच्यातला संवाद
2 जम्मू काश्मीरच्या राष्ट्रपती राजवटीला सहा महिन्यांची मुदतवाढ द्या; अमित शाह यांचा प्रस्ताव
3 मॉर्निंग बुलेटीन : पाच महत्त्वाच्या बातम्या
Just Now!
X