News Flash

हाणामारी प्रकरणात छत्तीसगडचे मंत्री, रायपूरच्या महापौरांना अटक

एका वृत्तवाहिनीवर चर्चेदरम्यान समर्थकांमध्ये हाणामारी झाल्याने छत्तीसगडमधील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि शिक्षणमंत्री ब्रिजमोहन अग्रवाल

| November 4, 2013 02:30 am

एका वृत्तवाहिनीवर चर्चेदरम्यान समर्थकांमध्ये हाणामारी झाल्याने छत्तीसगडमधील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि शिक्षणमंत्री ब्रिजमोहन अग्रवाल आणि रायपूरचे महापौर किरणमयी नाईक यांना अटक करण्यात आली आहे. नंतर दोघांची जामिनावर सुटका करण्यात आली.
रायपूर दक्षिण मतदारसंघातून नाईक हे अग्रवाल यांच्या विरोधात लढत देत आहेत. एका चर्चात्मक कार्यक्रमासाठी वृत्तवाहिनीने या दोघांना एका व्यासपीठावर आणले होते. त्या वेळी किरणमयी निवेदकाच्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी गृहमंत्री नानकराम कन्वर यांना उद्देशून काही आक्षेपार्ह शब्द वापरले. अग्रवाल यांनी नाईक यांना योग्य भाषा वापरण्याची समज दिली.
त्याच वेळी दोन्ही बाजूंच्या समर्थकांनी व्यासपीठाकडे धाव घेत खुर्चीची फेकाफेकी केली. पोलिसांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर दोन्ही नेते आणि त्यांच्या समर्थकांच्या विरोधात गुन्हे नोंदवण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2013 2:30 am

Web Title: chhattisgarh bjp minister raipur mayor arrested over clash
Next Stories
1 ब्रिटनमध्ये दीपावली उत्साहात साजरी
2 पाकिस्तानच्या अध्यक्षांकडून हिंदूंना दिवाळी शुभेच्छा
3 जास्त आवाजाचे फटाके उडविणाऱ्यांना अटक
Just Now!
X