Chhattisgarh Election Results 2018: छत्तीसगडमध्ये भाजपाला हादरा बसण्याची चिन्हे आहेत. ९० जागा असलेल्या छत्तीसगडध्ये काँग्रेस ६८ तर भाजपा १२ जागांवर आघाडीवर आहे. तर अन्य पक्षांचे १० उमेदवार आघाडीवर आहेत.

छत्तीसगडमध्ये गेल्या १५ वर्षांपासून भाजपाची सत्ता असून यंदा भाजपाला आव्हान देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता. ‘चावलवाला बाबा’ म्हणून प्रसिद्ध असलेले मुख्यमंत्री रमणसिंग यांनी लागोपाठ चौथ्यांदा निवडणूक जिंकण्यासाठी सारी ताकद पणाला लावली होती. गेल्या वेळी भाजपाला ४१ टक्के तर काँग्रेसला ४०.३ तर बसपला चार टक्के मते मिळाली होती. मते काही प्रमाणात विरोधात गेली तरी भाजपाला सत्ता कायम राखणे कठीण जाऊ शकते, अशी शक्यता होती. निकालातून या शक्यतेवर शिक्कामोर्तब झाले.

रमणसिंह यांचे सलग चौथ्यांदा सत्ता मिळवण्याचे स्वप्न अखेर भंगले आहे. अजित जोगी यांच्या नवीन पक्षामुळे काँग्रेसचे नुकसान होईल, असा दावा भाजपाचे नेते खासगीत करत होते. पण निकालातून अजित जोगी यांच्या पक्षाने काँग्रेसचे नुकसान झाले नाही, हे स्पष्ट झाले आहे.

Live Blog

14:43 (IST)11 Dec 2018
VIDEO: काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष

काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष

14:41 (IST)11 Dec 2018
छत्तीसगडमधील जनादेश मान्य: महेश शर्मा

छत्तीसगडमधील भाजपाच्या पराभवर केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'छत्तीसगडमधील निकाल हा आमच्यादृष्टीने चांगला लागला नाही. छत्तीसगडमध्ये चांगले काम केले होते. पण हा जनादेश आम्ही स्वीकारतो. राज्य आणि केंद्रातील समीकरणे वेगळी असतात त्यामुळे पंतप्रधान कार्यालयावर याचा परिणा होणार नाही", असे शर्मा यांनी सांगितले.

14:38 (IST)11 Dec 2018
रमण सिंह आघाडीवर

मुख्यमंत्री रमण सिंह यांनी राजनंदगाव येथून आघाडी घेतली असून ते १०० मतांनी आघाडीवर आहेत. काँग्रेस उमेदवार आणि वाजपेयींच्या पुतणी करुणा शुक्ला यांना ३, ६०९ मते असून सिंह यांना ३,७५४ मते मिळाली आहेत. अद्याप या मतदारसंघात मतमोजणी सुरू आहे.

13:59 (IST)11 Dec 2018
Results Live: अब की बार, काँग्रेस सरकार

13:56 (IST)11 Dec 2018
Results LIVE: भाजपाला हादरा?, चार राज्यात काँग्रेस आघाडीवर

12:27 (IST)11 Dec 2018
छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता

छत्तीसगमडध्ये एक्झिट पोलचा अंदाजही चुकीचा ठरला असून या राज्यात भाजपाला हादरा बसला आहे. रमण सिंह यांच्या नेतृत्वाखालील भाजपाला निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. विधानसभेतील ९० पैकी ६५ जागांवर काँग्रेस, १७ जागांवर भाजपा आणि अन्य पक्षांचे ८ उमेदवार आघाडीवर आहेत. 

11:27 (IST)11 Dec 2018
काँग्रेस ४० जागांवर, भाजपा फक्त १५ जागांवर आघाडीवर तर जनता काँग्रेस ५ जागांवर आघाडीवर

काँग्रेस ४० जागांवर, भाजपा फक्त १५ जागांवर आघाडीवर तर जनता काँग्रेस ५ जागांवर आघाडीवर

11:19 (IST)11 Dec 2018
काँग्रेसची बैठक

रायपूरमध्ये काँग्रेस पक्षाची बैठक सुरू आहे. या बैठकीला अनेक स्थानिक नेत्यांनी उपस्थिती दर्शवली आहे. २०१३ मध्ये सुरूवातीच्या निकालावेळीच विजोत्सोव साजरा केल्यामुले काँग्रस पक्षाला टिकाला सामोरं जावे लागले होते. मात्र, आता ती काळजी घेण्यासाठी काँग्रेस पक्षाने बैठक बोलवली आहे.  A growing sense of confidence at the Congress control room at Rajiv Bhavan in Raipur. Leaders constantly being told to stay calm though given they had celebrated too early in 2013 @IndianExpress pic.twitter.com/ZwCVpKVUZV— Dipankar Ghose (@dipankarghose31) December 11, 2018

11:14 (IST)11 Dec 2018
भाजपा २६, काँग्रेस ५७ आणि इतर ७ जागांवर आघाडीवर

भाजपा २६, काँग्रेस ५७ आणि इतर ७ जागांवर आघाडीवर

11:14 (IST)11 Dec 2018
भाजपा २६, काँग्रेस ५७ आणि इतर ७ जागांवर आघाडीवर

भाजपा २६, काँग्रेस ५७ आणि इतर ७ जागांवर आघाडीवर

10:47 (IST)11 Dec 2018
छत्तीसगड भाजपाचा 'हात' सोडणार? काँग्रेस सत्तास्थापनेकडे

काँग्रेस २१ जागांवर, भाजपा फक्त ५ जागांवर आघाडीवर तर जनता काँग्रेस दोन जागांवर आघाडीवर

10:17 (IST)11 Dec 2018
काँग्रेस १३, भाजपा ४ तर जनता काँग्रेस एका जागेवर आघाडीवर
10:15 (IST)11 Dec 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलवली बैठक

पाच राज्यातील निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवनात बैठक बोलवली आहे. भाजपामधील दिग्गज नेते उपस्थित राहण्याची शक्यता. साडेदहा वाजता होणार बैठक. 

10:13 (IST)11 Dec 2018
भाजपा पराभवाच्या छायेत

छत्तीसगडमध्ये काँग्रेस पक्षाला पुर्ण बहुमत मिळण्याची शक्यता आहे. भाजपा पराभवाच्या छायेत

10:12 (IST)11 Dec 2018
काँग्रेसचा विजयोत्सोव सुरू

पहिल्या सत्रात हाती आलेल्या निकालानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्लीमध्ये फटाके फोडून विजय साजरा केला. तीन राज्यामध्ये काँग्रेस पक्ष आघाडीवर आहे.

10:02 (IST)11 Dec 2018
काँग्रेस ५४ जागांवर आघाडीवर, तर भाजपा २४ जागांवर पुढे.

काँग्रेस ५४ जागांवर आघाडीवर, तर भाजपा २४ जागांवर पुढे.

09:48 (IST)11 Dec 2018
माजी मुख्यमंत्री अजीत जोगी पिछाडीवर

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजीत जोगी पिछाडीवर असून ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. मारवाही येथून भाजपा उमेदवार आघीडीवर आहे.


09:40 (IST)11 Dec 2018
छत्तीसगडमध्ये काँग्रेसला आघाडी, भाजपा पिछाडीवर

छत्तीसगडमध्ये ८९ पैकी काँग्रेस ५४ जागांवर आघाडीवर आहे. येथे सत्ताधारी भाजपाला जोरदार झटका बसला आहे. भाजरा  फक्त ३० जागांवर आघाडीवर आहे. 

09:34 (IST)11 Dec 2018
रमन सिंह आघाडीवर

डॉ. रमन सिंह राजनांदगांवमध्ये आघाडीवर, काँग्रेस उमेदवाराला टाकले पिछाडीवर