छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात आज चार नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले.  एसएसपी सिद्धार्थ तिवारी, पोलीस अधीक्षक शालभ सिन्हा व सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांसमोर या नक्षलवाद्यांनी शरणागती पत्कारली. या चार नक्षलवाद्यांपैकी तीन जणांवर आठ लाखांचं इनाम होतं. तर, या चौघांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.

या अगोदर छत्तीसगडच्या राजनंदगाव जिल्ह्य़ात झालेल्या चकमकीत दोन महिलांसह चार नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले होते. या वेळी एक पोलीस अधिकारी शहीद झाला होता. ठार झालेल्या सर्व नक्षलवाद्यांना पकडण्यासाठी इनाम जाहीर करण्यात आले होते.

पारधौनी गावात सात-आठ नक्षलवादी आले असून त्यांनी तेथे वास्तव्य केल्याची माहिती मिळाली जवानांना मिळाली होती . त्यानंतर २८ जणांच्या पथकाने या परिसरात कारवाई सुरू करून वेढा घातला तेव्हा नक्षलवाद्यांनी बेछूट गोळीबार केला, त्याला पोलिसांनी प्रत्युत्तर दिले. जवळपास २० मिनिटे चकमक सुरू होती. चकमक थांबल्यानंतर घटनास्थळी शोध घेतला असता दोन महिलांसह चार नक्षलवाद्यांचे गणवेशातील मृतदेह आढळले होते.