News Flash

भर बाजारात पत्रकाराची हत्या

छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात शुक्रवारी माओवाद्यांनी भर बाजारात साप्ताहिक वृत्तपत्राच्या एका पत्रकाराची हत्या केल्याची घटना घडली आहे.

| December 7, 2013 12:54 pm

छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात शुक्रवारी माओवाद्यांनी भर बाजारात साप्ताहिक वृत्तपत्राच्या एका पत्रकाराची हत्या केल्याची घटना घडली आहे. शस्त्रास्त्रधारी माओवाद्यांनी साई रेड्डी या पत्रकाराची धारदार शस्त्रांनी वार करून निर्घृणपणे हत्या केली आहे. विजापूर जिल्ह्यातील बासगुडा या गावात आठवडा बाजारात रेड्डी यांच्यावर माओवाद्यांच्या टोळीने वार केले. त्यानंतर जखमी झालेल्या रेड्डी यांना नागरिकांनी रुग्णालयात नेले. पण, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
५१ वर्षीय रेड्डी हे गेल्या अनेक वर्षांपासून माओवाद्यांचा प्रभाव असलेल्या विजापूर जिल्ह्यात पत्रकारिता करत होते. माओवादी आणि पोलिसांच्या चकमकीत आदिवासी नागरिक कसे बळी पडते आहेत, याबाबत त्यांनी विशेष लिखाण केले होते. माओवाद्यांनी फेब्रुवारीमध्येही नेमीचंद जैन या पत्रकाराची बस्तर जिल्ह्यात हत्या केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2013 12:54 pm

Web Title: chhattisgarh maoists kill journalist at weekly market in bastar village
Next Stories
1 सोनिया-मंडेला यांच्या भावपूर्ण भेटीला उजाळा
2 ठपका ठेवल्यानंतर गांगुली यांच्यावरील कारवाईत कुचराई करणे गैर-सिब्बल
3 वादग्रस्त वक्तव्यानंतर फारुख यांची माफी
Just Now!
X