23 January 2021

News Flash

ही निवडणूक ‘नवीन छत्तीसगड’च्या निर्मितीसाठीची – शाह

छत्तीसगडमधील निवडणूक प्रचार सध्या जोमात सुरू आहे. राजकीय पक्ष आरोप-प्रत्यारोप करत आहेत. भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी आज छत्तीसगडमध्ये काँग्रेस पक्षावर टीकास्त्र सोडले. ज्या पक्षाला

अमित शाह

छत्तीसगडमधील निवडणूक प्रचार सध्या जोमात सुरू आहे. राजकीय पक्ष आरोप-प्रत्यारोप करत आहेत. भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी आज छत्तीसगडमध्ये काँग्रेस पक्षावर टीकास्त्र सोडले. ज्या पक्षाला नक्षलवाद्यांमध्ये क्रांतिकारक दिसतात. नक्षलवाद हा क्रांतीचं माध्यम वाटतो, तो पक्ष कधीच छत्तीसगडचं भलं करू शकत नाही,’ अशा शब्दांत भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी काँग्रेसवर निशाना साधला. यावेळी शाह यांनी छत्तीसगड राज्यातील भाजपा सरकारनं केलेल्या विकासकामांचा हवालाही दिला. ‘छत्तीसगड सरकारनं विकासाचे सगळे विक्रम मोडले आहेत. राज्याला नक्षलमुक्त केलं आहे. ही निवडणूक ‘नवीन छत्तीसगड’च्या निर्मितीसाठी होत आहे. त्यासाठी राज्यातील बुद्धिवादी, महिला, तरुण, शेतकरी व सर्वसामान्य माणसाशी संवाद साधून भाजपनं आपला जाहीरनामा तयार केला आहे. छत्तीसगडची जनता पुन्हा एकदा आम्हाला आशीर्वाद देईल, असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2018 4:58 pm

Web Title: chhattisgarh polls amit shah releases bjp manifesto praises state govt for containing naxalism
Next Stories
1 शबरीमाला प्रवेश वाद : ५५० महिलांनी दर्शनासाठी केली ऑनलाईन नोंदणी
2 मध्य प्रदेश निवडणूक: जाहीरनाम्यात काँग्रेसचे गोशाळा, शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन
3 छत्तीसगडमध्ये राहुल गांधींचे परप्रांतीय कार्ड; स्थानिकांनाच रोजगाराचे आश्वासन
Just Now!
X