छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल काँग्रेसच्या चार बंडखोर नेत्यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून अन्य नऊ जणांवर नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. धरमजयगड, लायलुंगा आणि सरणगड विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवारांनी केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. निलंबित करण्यात आलेल्या नेत्यांनी पक्षाने पाठविलेल्या नोटिसांनाही प्रतिसाद दिलेला नाही. याबाबत पुढील कारवाई करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. सुरेंद्रसिंग सिदर, गुलाबसिंग राठिया, गोपाळ बाघे आणि गोल्डी नायक यांना निलंबित करण्यात आले आहे.