बिलासपूर जिल्ह्यात राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून राबवण्यात आलेल्या नसबंदी शिबिरात १५ महिलांचा मृत्यू झाला. या महिलांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आज बिलासपुरला गेले आहेत. या दरम्यान, छत्तीसगड सरकारने सांगितले आहे, की नसबंदीनंतर महिलांना देण्यात आलेल्या औषधात उंदिर मारण्याचे विष होते. छत्तीसगडचे प्रधान सचिव (आरोग्य) डॉ. आलोक शुक्ला यांनी सांगितले, की सिप्रोसिन नावाच्या या औषधात विषारी जिंक फॉस्फेट होते. उंदिर मारण्याच्या औषधात जिंक फॉस्फेट वापरले जाते.
संततीनियमन शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात आलेल्या औषधांमध्ये झिंक फॉस्फाइड होतं, असं प्राथमिक तपास-चौकशीतून समोर आलं आहे. उंदीर मारायच्या औषधात हे रसायन वापरलं जातं. त्यामुळेच आत्तापर्यंत १५ महिलांना शस्त्रक्रियेनंतर प्राण गमवावे लागल्याचा अहवाल आलोक शुक्ला यांनी दिला आहे. त्याआधारे संबंधितांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.

Forest department staff succeeded in imprisoning a leopard that fell into a well
Video : बिबट्याची दोनदा हुलकावणी अन् जेरबंद करण्याचा थरार
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी
Nagpur RTO has succeeded in getting 90 percent revenue compared to target given by government
नागपूर ‘आरटीओ’ मालामाल! गेल्यावर्षीच्या तुलनेत…
High Court restrains demolition of loom department in Mafatlal
मफतलालमधील यंत्रमाग विभाग पाडण्यास उच्च न्यायालयाचा मज्जाव