News Flash

छत्तीसगड : नक्षलवाद्यांनी घडवला भूसुरुंग स्फोट

दोन जण जखमी; एक जीप उडवली

छत्तीसगड : नक्षलवाद्यांनी घडवला भूसुरुंग स्फोट

छत्तीसगडमधील नक्षलग्रस्तभाग असलेल्या बीजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोटाद्वारे एक वाहन उडवले. ज्यामध्ये दोन नागरीक जखमी झाले.

बीजापूर जिल्ह्याचे आयजी सुंदरराज यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, जिल्ह्यातील बासागुडा आणि तर्रेम गावाच्या मध्य राजपेंटा गावाजवळ नक्षलवाद्यांनी सकाळी एक जीप भूसुरुंग स्फोटाद्वारे उडवली.

या घटनेत वाहन मालक मोहम्मद इकबाल अन्सारी आणि मॅकानिक बलराम प्रधान हे जखमी झाले. या दोघांनाही बासागुडा येथील सीआरपीएफच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या दोघांचीही प्रकृती धोक्याबाहेर असल्याची देखील माहिती देण्यात आली आहे.

नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या वाहनास निशाणा बनवण्यासाठी भूसुरूंग पेरला असण्याची शक्यता, पोलिसांनी वर्तवली आहे. परिसरात सध्या नक्षलवाद्यांविरोधात जोरदार मोहीम सुरू असल्याने, नक्षलवाद्यांकडून अशाप्रकारे हल्ले केले जात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 1, 2020 1:55 pm

Web Title: chhattisgarh two civilians injured in ied blast in bijapur district msr 87
Next Stories
1 “देश जळत असताना मोदींनी गाण्यावर धरलाय ठेका”; विरोधकांनी साधला निशाणा
2 कोविशिल्ड लस सुरक्षितच; स्वयंसेवकाच्या आरोपानंतर सिरमचा दावा
3 किम जोंग उन यांना चीनने करोनाची लस दिली; अमेरिकनं तज्ज्ञांचा दावा