News Flash

दहशतवाद्यांशी लढण्यासाठी भारतीय सुरक्षा यंत्रणांनीच मला बनावट पासपोर्ट दिला- छोटा राजन

१६ वर्षांपूर्वी दाऊदने मला बँकॉकमध्ये असताना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.

संघटित गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या छोटा राजन

दहशतवाद्यांशी लढण्यासाठी मदत करत असल्यामुळे भारतीय सुरक्षा यंत्रणांनीच मला बनावट पासपोर्ट तयार करून दिला, अशी माहिती कुख्यात गुंड छोटा राजन याने विशेष न्यायालयात दिली. १६ वर्षांपूर्वी दाऊदने मला बँकॉकमध्ये असताना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी भारतीय सुरक्षा यंत्रणांनीच मला मोहन कुमार या बनावट नावाने पासपोर्ट तयार करून दिल्याचे राजनने सांगितले. छोटा राजनला सध्या दिल्लीच्या तिहार जेलमध्ये ठेवण्यात आले असून याठिकाणहून व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे त्याची साक्ष नोंदविण्यात आली.
छोटा राजन आणि सरकारचे खास संबंध; माजी पोलीस अधिकाऱ्याचा दावा
मी भारताच्या दहशतवादीविरोधी लढ्याचा आणि निष्पाप नागरिकांना मारणाऱ्या देशविरोधी घटकांविरुद्धच्या लढाईचा एक भाग होतो. मला मदत केलेल्या आणि देशाच्या भल्यासाठी मी मदत केलेल्या लोकांची नावे सांगू शकत नाही, असे छोटा राजनने न्यायालयासमोर सांगितले.
बनावट पासपोर्ट प्रकरणात छोटा राजन आणि तीन पासपोर्ट अधिकाऱ्यांवर विशेष कोर्टात खटला सुरू आहे. याप्रकरणी आज छोटा राजनचा जबाब नोंदवण्यात आला. छोटा राजनला मागील वर्षी इंडोनेशियामध्ये अटक करण्यात आली होती. मी गुप्तचर यंत्रणांना १९९३ स्फोटाचा कट रचणाऱ्यांची माहिती देत असल्याचे दाऊदच्या लोकांना कळले होते. त्यानंतर त्यांनी माझा पाठलाग सुरु केला होता. दाऊदच्या लोकांनी दुबईत माझा पासपोर्ट काढून घेतला, असेही छोटा राजनने यावेळी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2016 5:21 pm

Web Title: chhota rajan claims that indian agencies gave him a fake passport
Next Stories
1 पंजाबला गतवैभव मिळवून देऊ, ‘आवाज ए पंजाब’ची सिद्धूंकडून औपचारिक घोषणा
2 दहशतवाद पोसणाऱ्यांवर निर्बंध लादा, मोदींचा पुन्हा पाकवर निशाणा
3 पंजाबमध्ये सत्तेवर येताच बादल कुटुंबीयांना तुरूंगात टाकू: अरविंद केजरीवाल
Just Now!
X